स्वाती नाईक, झी मीडिया, पनवेल: पनवेल तालुक्यातील तारागावच्या हद्दीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत (Mumbai - Goa Highway) उभ्या असलेल्या एका ऑडी कारमध्ये शुक्रवारी सायंकाळी  संजय कार्ला या इसमाचा मृतदेह सापडला. त्याची गोळ्या घालून हत्या करुन त्याचा मृतदेह कारमध्ये कोंबण्यात आला होता. संजय कार्ला हा 'मोक्का' अंतर्गतला गुन्हेगार असून तो सध्या प्यारोलवर (Parole) सुटलेला असल्याचे समजते आहे. पुणे परिसरात या आरोपीने अनेकांची आर्थिक फसवणूक (Fraud) केली आहे. पोलीस कार मालकाचा शोध घेत आहेत. हत्या झालेला संजय कार्ला हा गुन्हेगार टोळीशी (Crime news) निगडीत असल्याने हत्या करणारा देखील गुन्हागर टोळीतील असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार पनवेल तालुका पोलिसांकडून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. (a man who was killed in a car on the mumbai goa highway may be a convicted criminal)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई गोवा हायवेवर नारायण राणे (Narayan Rane) यांच्या फार्म हाऊसच्या बाजूला एका ऑडी (Audi) गाडीत मृतदेह मिळाला असून या प्रकरणानं एकच खळबळ माजली आहे. पनवेल (Panvel) पोलीस घटनास्थळी पोहचले असून गाडीची कसून तपासणी सुरू आहे. मृत व्यक्ती गाडीच्या मागच्या बाजूला मृत अवस्थेत आढळला असून मृताच्या नाका तोंडातून रक्त वाहत असल्याचे दिसले होते. आता हा नक्की काय प्रकार आहे?, याचा तपास सुरू असून अगदी महागड्या गाडीत डेड बॉडी (Dead Body) सापडल्याने खळबळ माजली आहे.


हेही वाचा : Viral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद


या मृत व्यक्तीचं नावं संजय कार्ला असल्याचं समजते आहे. अद्याप त्याचा व्यवसाय कळला नसून हा मृतदेह येथे कसा आला आणि ही गाडी येथे कोणी आणली याचा तपास सध्या पोलिस करत आहेत. मृतदेह सापडल्यानं सगळीकडेच चिंतेचं आणि भितीचं वातावरण आहे. त्यामुळे सध्या सगळीकडेच सतर्क (Alertness) राहण्याचा इशारा यामुळे पुन्हा एकदा उपस्थित राहिला आहे.  


समाजात खळबळ : 


सध्या आपल्या समाजात अनेक विचित्र आणि धक्कादायक घटना घडताना दिसत (Shocking News)आहेत. त्यामुळे लोकांमध्ये कायमच भितीचं वातावरण असल्याचे पाहायला मिळते आहे. सध्या श्रद्धा वालकर हत्याकांडांमुळे (Shraddha Walker Case) अख्ख्या देशात खळबळ माजली आहे. 2012 साली निर्भया प्रकरण झाल्यानंतर आता या नव्या हिसंक प्रकरणानं देशात पुन्हा एकदा राग, चिंता आणि भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशा या घटनांमुळे लहान मुलींपासून ते मोठ्या तरूण मुलींच्या (Young Girls) सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाल आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा श्रद्धा ही पुन्हा एकदा बळी गेली आहे. सध्या असंच एक प्रकरण ताजं असताना मुंबई - गोवा महामार्गावर (Mumbai - Goa Highway) एक मृतदेह आढळला आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.