Shocking News : हिंगोलीत (Hingoli) एका पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. आपले कर्तव्य बजावत असतानाच त्यांचा मृत्यू झाला आहे (bike accident).  हिंगोली- कळमनुरी मार्गावर भरधाव कारची दुचाकीला धडक बसली. यामुळे बंदोबस्तावर जाणाऱ्या पोलिस जमादाराचा मृत्यू झाला आहे (Shocking News). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरेश बळीराम बांगर (57) असे या मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. बागंर हे पोलिस जमादार पदावर कार्यरत होते. कळमनुरी पोलिस ठाण्यांतर्गत तालुका विशेष शाखेत ते कार्यरत होते. बांगर हे हिंगोली येथील बैठक आटोपून कळमनुरी येथे मिरवणुक बंदोबस्तावर निघाले होते. यावेळी त्यांच्या दुचाकीला भरधाव कारने धडक दिली.


सुरेश बळीराम बांगर हे मंगळवारी सकाळी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीच्या निमित्ताने आले होते. दुपारी बैठक आटोपून ते दुचाकी वाहनावर कळमनुरीकडे निघाले होते. त्यांचे दुचाकी वाहन हिंगोली ते कळमनुरी मार्गावर सेलसुरा शिवारात आले असतांना भरधाव वेगात येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात बांगर यांचा मृत्यू झाला आहे.


समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी


वाहनांचे टायर घासले असल्यास समृद्धी महामार्गावर प्रवेश मिळणार नाही. महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी संभाजीनगर आरटीओनं तपासणी मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील चार एन्ट्री पॉइंटवर सोमवारी 208 वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यातील 22 वाहनांचे टायर घासलेले तसंच जीर्ण झालेले आढळल्यानं त्यांना माघारी पाठविण्यात आले. समृद्धी महामार्गावरून प्रवास सुरू झाल्यापासून पहिल्या 100 दिवसांत जवळपास 900 पेक्षा जास्त अपघात झाले आहेत. या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. सुसाट वेगामुळे गाडी नियंत्रणाबाहेर जाऊन तसंच टायर फुटून अपघात होण्याचे प्रमाण अधिक असल्याचं आरटीओंच्या पाहणीत दिसून आलंय. त्यामुळे समृद्धीवरील अपघात रोखण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.


दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई


नंदुरबार शहरासह जिल्ह्यात रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहनधारक पोलीस दलाने कडक कारवाई सुरु केली आहे. एकच दिवसात पोलिसांनी  37 मद्यपी वाहनचालाकंवर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस विभागाकडून सायंकाळापासून वाहन चालकांची तपासणी करण्यात येत आहे. या मोहिमेमुळे अपघात टाळण्यास मोठी मदत होणार आहे.