Beed Crime News : पोलिस हे जनतेचे रक्षक आहेत. मात्र, रक्षकच भक्षक बनल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये घडला आहे. एका मद्यपी पाेलिस शिपायाने घरात घुसून महिलेचा हात धरत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आहे. बीडच्या धारुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा  प्रकार घडला आहे. या घटनेमुळे पीडित महिलेला मोठा धक्का बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीडच्या धारूर पोलिस ठाण्यातील एका हवालदाराने दारूच्या नशेत एका महिलेच्या घरी जावून हात धरला. महिलेने आरडाओरडा करताच ग्रामस्थ जमा झाले. त्यानंतर या दारूड्या पोलिसाला ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला. या पोलिस शिपायाविरोधात धारूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


धारूर पोलिस ठाण्यातील एक कर्मचारी काल रात्री उशिरा दारू पिऊन तालुक्यातील एका गावात गेला. अंधाराचा फायदा घेत एका घरात जावून त्याने महिलेचा हात धरला. यावेळी महिलेने आरडाओरडा केला. त्यामुळे नातेवाईकांसह ग्रामस्थ जमा झाले. त्यानंतर या दारूड्या पोलिसाला सर्वांनीच चोप दिला. तेथून त्याला धारूर पोलिसांच्या स्वाधीन केले मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


प्रेमप्रकरणातून तरुणीला मारहाण


संभाजी नगरमध्ये एका तरूणानं तरूणीला बेदम मारहाण केलीय. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील वसई-बोदवड इथला हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण एका मुलीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसतोय. ही मुलगी वारंवार विनंती करतेय मात्र तो थांबत नाही. प्रेमप्रकरणातून ही मारहाण झाल्याचं समजतंय. या व्हिडिओवरून सोशल मीडियात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मारहाण करणा-या तरूणावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. 


रोडरोमियोंना कोल्हापूरकरांनी चोपुन काढले


शालेय मुलीची छेड काढणा-या 3 रोडरोमियोंना कोल्हापूरकरांनी बेदम चोप दिला. कोल्हापुरात शाहू मैदान बस स्टॉप इथली ही घटना आहे. नंतर संबंधित तरूणीनेही रूद्रावतार धारण करत, त्याला चपलेनं बदडलं. बसस्टॉपवर या मुली बसची वाट पाहात थांबल्या असताना हे टवाळखोर त्यांची छेड काढत होते. तिथून जाणारे विवेक वोरा यांनी त्यांना हटकल्यावर त्यांनी वोरांना शिवीगाळ केली. त्यावर वोरांनी त्यांची धुलाई केली. नंतर जमावानंही त्यांची पब्लिक धुलाई केली. या मवाल्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.