Threat to Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणाऱ्या जयेश पुजारी याच्या चौकशीत धक्कादायक खुलासा झाला आहे. गडकरींसह कर्नाटकातील नेते रडारवर होते. नेत्यांच्या हत्येसाठी जेलमधून गुन्हेगारांना आर्थिक मदत पुरवल्याची माहिती समोर आली आहे. बेळगावच्या तुरुंहातून काही महिन्यांपूर्वी सुटलेल्या एका कुख्यात गुन्हेगाराने कर्नाटकातील काही नेत्यांची हत्या करण्यासाठी हत्यार मिळवून देण्यासाठी जेलच्या आतून जयेश पुजारी तथा शाकीर याने आर्थिक आणि इतर मदत केली होती, अशी माहिती आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जयेश पुजारी याची चौकशी केल्यानंतर धक्कादायक समोर आली. गडकरींसह कर्नाटकातील नेतेही रडारवर होते अशी माहिती त्याने दिली आहे. नेत्यांच्या हत्येसाठी बेळगाव जेलमधून काही महिन्यांपूर्वी सुटलेल्या कुख्यात गुन्हेगारांना जयेशने आर्थिक मदत पुरवली. हत्येसाठी लागणारी हत्यारं मिळवून देण्यासाठी जेलमधून जयेशने मदत केल्याची माहिती समोर आली आहे. पीएफआय, डी गँग आणि लष्कर ए तोयबा सोबत संपर्क असल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले.मात्र, आता त्याने गडकरींसह कर्नाटकातील इतर नेत्यांनी विरोधातही कट रचल्याचे सांगितल्यानंतर जयेशच्या निशाण्यावर आणखी कोणते नेते होते.? यामागचा सूत्रधार कोण आहे? याचा तपास सुरु करण्यात आला आहे.


नितीन गडकरी यांना पुन्हा धमकीचे फोन, कार्यालयात लागोपाठ तीन कॉल


नागपूर पोलिसांनी कर्नाटक पोलिसांना याबाबत माहिती ही दिली होती. जयेश याने बेळगावच्या तुरुंगातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात दोन वेळेला धमकीचे फोन केले होते. त्यानंतर 28 मार्चला त्याला नागपूर पोलिसांनी चौकशीसाठी नागपुरात आणले होते. तेव्हापासून नागपूर पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणाच्या समन्वयाने जयेश याची चौकशी सुरु आहे.



जयेश याचे पीएफआय, डी गॅंग आणि लष्कर ए तोयबा सोबत संपर्क असल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले होते. आता त्याने गडकरी शिवाय कर्नाटकातील इतर नेत्यांनी विरोधातही कट रचल्याने त्यादृष्टीने तपास सुरु करण्यात आला आहे.  गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात धमकीचा फोन करणारा जयेश कांथावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा प्रतिबंधित संघटन PFI, LET आणि डी गँगशी त्याचा संबध आल्याचे चौकशीत पुढे आले आहे. याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माहिती दिली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आता चौकशी करण्यात येत आहे. आणखी कोणाला त्याने धमकी दिली, याची माहिती घेण्यात येत आहे.