पुणे : जात लपवून सोवळे मोडले म्हणून स्वयंपाकी महिलेवर गुन्हा दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार पुरोगामी पुणे शहरात घडलाय. हवामान विभागाच्या माजी संचालिका मेधा खोले यांनी या प्रकरणी स्वयंपाक करणा-या महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी याप्रकरणी स्वयंपाक करणाऱ्या महिलेविरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. मेधा खोले यांना गौरी-गणपतीदरम्यान सोवळ्यातील स्वयंपाक करणारी महिला हवी होती. 


२०१६मध्ये निर्मला कुलकर्णी नवाची महिला त्यांच्याकडे आली. कामाची गरज असल्याचं सांगत त्यांनी खोले यांच्याकडे स्वयंपाकाचं काम मागितलं. त्यावेळी मेधा खोले यांनी तिच्या घरी जाऊन ती ब्राम्हण आहे का याची पडताळणी केली आणि तिला स्वयंपाकाचं काम दिलं. नुकत्याच पार पडलेल्या गौरी-गणपतीतही निर्मला हीने मेधा खोले यांच्या घरी सोवळ्यातील नैवेद्याचा स्वयंपाक केला. 


मात्र बुधवारी मेधा खोले यांना निर्मला ही ब्राम्हण नसल्याची माहिती मिळाली. मेधा खोले यांनी या संदर्भात माहिती घेतली असता निर्मला हिचं खरं नाव निर्मला कुलकर्णी नसून निर्मला यादव असल्याचे निष्पन्न झाले. यावरुन दोघींमध्ये वाद झाला. यावेळी निर्मला हिने आपल्याला शिवीगाळ केली आणि धमकावल्याची तक्रार मेधा खोले यांनी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली.