A Three Year Old Boy Died: बेकरीसाठी पीठ मळण्याच्या मशिनमध्ये अडकून तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाशिकमध्ये घडली आहे. गुरुवारी रात्री पंचवटी परिसरातील इंद्रकुंड येथील एका बेकरीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. (Nashik Crime News)


खेळताना गिरणीत पडला 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिहान उमेश शर्मा (३) असे या चिमुकल्याचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घडलेल्या या प्रकारामुळं रिहानच्या कुटुंबीयाना मोठा धक्का बसला आहे. शर्मा कुटुंबीयांचा बेकरीचा व्यवसाय आहे. त्याच्या घराच्या बाजूलाच व्यवसायाला लागणारे सर्व साहित्य आहेत. तेथेच  गुरुवारी रात्री नऊ वाजता रिहान खेळत होता. 


संपूर्ण शरीर फ्रॅक्चर


बेकरीतील विविध पदार्थ एकजीव करण्यासाठी वापरण्यात येणारी गिरणी (ग्रँडर वा गिरणी) बंद होती. तिथे खेळताना तोल गेल्याने रिहान गिरणीत पडला. त्याच्या धक्क्याने गिरणी सुरु झाल्याने त्यातल्या पात्यांसहित बेल्टमध्ये अडकून रिहानचे पूर्ण शरीर फ्रॅक्चर झाले. रिहान जिवाच्या आकांताने ओरडत होता. त्याच्या किंकाळ्या ऐकून आई- वडिल धावत आले व समोरच दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमिनच हादरली. अखेर रियांशच्या वडिलांनी मनाचा हिय्या करुन त्याला बाहेर काढले. 


रुग्णालयात दाखल


रियांशच्या आई-वडिलांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याला मृत घोषित करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात त्याच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


अंतर्गंत रक्तस्त्राव


दरम्यान, या दुर्घटनेत रियांशच्या डोक्यापासून-पायापर्यंत हाडांचे तुकडे झाले होते. त्याला कोणतीही जखम झाली नसली तरी अंतर्गंत रक्तस्त्राव अधिक झाल्याने त्याची प्रकृती बिघडली व त्याचा मृत्यू झाला, असं वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात नमूद केलं आहे. 


दरम्यान, दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेत खेळताना एक चिमुकला सार्वजनिक विहिरीत पडला होता. नाशिकच्या दिंडोरी जिल्ह्यात हा प्रकार घडला होता. दिशांत अजय गोवर्धने असं या मुलाचे नाव असून खेळता- खेळता दिशांत गावातील स्मशानभूमीजवळ असलेल्या सार्वजनिक विहिरीत गेला. त्याचवेळी अनावधानाने तो विहिरीतील पाण्यात पडला. पोहता येत नसल्याने त्याच्या विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच हळहळ व्यक्त होत आहे. 


पालकांनी काळजी घेण्याची गरज


दोन दिवसांतच आणखी एका बालकाचा खेळता खेळता मृत्यू झाल्याने पालकांनी मुलांवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याची गरज आहे. मुलांना आता मे महिन्याच्या सुट्टा असल्याने मुलं अधिक वेळ घराबाहेर असतात. अशावेळी पालकांनी सतत त्यांच्या अवती-भवती राहावे.