Mumbai Bike Stunt Video: वाढते अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिस साततत्याने जनजागृती करत आहे. मात्र, एका तरुणाने असे कृत्य केले जे पाहून वाहतूक पोलिसांनाही धक्का बसला. एक तरुणाचा स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ मुंबईतील आहे. या व्हिडिओत एक तरुण दोन तरुणींसोबत खतरनाक स्टंट करताना दिसत आहे. मुंबई पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


13 सेकंदाच्या व्हिडिओत खतरनाक स्टंट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या 13 सेकंदाच्या व्हिडिओत एक तरुण खतरनाक स्टंट करताना दिसत आहे. एका बाईकवर तिघेजण प्रवास करत आहेत. तिघांनाही हेल्मेट घातलेले नाही. या व्हिडिओत दोन तरुणी आणि एक  तरुण दिसत आहे. यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.


नेमकं काय आहे या व्हिडिओत


13 सेकंदाच्या व्हिडिओत तरुणाने धावत्या तरुणाने अत्यंत डेंजर असा स्टंट केला आहे. तरुण बाईक चालवत आहे. एक तरुणी पुढे बसली आहे तर, दुसरी तरुणीने मागे बसली आहे. या दोघींच्या मध्ये हा तरुण बसला आहे. तरुण भरधाव वेगाने बाईक चालवत आहे. धावत्या बाईकवर हा तरुण बाईकचे पुढचे चाक उचलून व्हिली मारताना व्हिडिओत दिसत आहे. तर, पुढे बसलेली मुलगी देखील मध्येच आपले हात सोडून देत आहे. मागची तरुणी याला घट्ट पकडून बसली आहे. अत्यंंत वेगात हा तरुण बाईक चावलत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. 


स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल


हा व्हडिओ मुंबईमधील आहे. वर्दळीच्या ठिकाणचा आहे. कारण मागे रस्त्यावर काम सुरु असल्याचे बॅरीगेट्स पहायला मिळत आहेत. भर रस्त्यात सुरु असलेली ही हुल्लडबाजी पाहून यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला.  @PotholeWarriors नावाच्या ट्विटर हँडल वरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला.  हा व्हिडिओला 127.3k  Views आले आहेत. 



मुंबई पोलिसांची कारवाई


हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करताना मुंबई पोलिसांना टॅग करण्यात आले होते. पोलिसांनी हा व्हिडिओ पाहून तात्काळ गंभीर्याने याची दखल घेतली. या व्हिडिओत दिसणाऱ्या तरुणांबाबत  कोणाकडे काही माहिती असल्यास, तुम्ही आम्हाला थेट DM करू शकता असा रिप्लाय पोलिसांनी दिला होता. या प्रकरणी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांविरुद्ध आयपीसीच्या कलम 279 (रॅश ड्रायव्हिंग) आणि 336 (जीव धोक्यात घालणे) तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.