Panipuri In Mumbai Local Train : लोकल ट्रेन आणि पाणीपुरी हे दोन्ही मुंबईकरांच्या जीव्हाळ्याचे विषय आहे. लोकल ट्रेन म्हणजे मुंबईकरांची लाईफन लाईन तर, पाणीपुरी म्हणजे सर्वात आवडता पदार्थ. नाक्यावर, रस्त्याच्या कडेला कुठेही पाणीपुरीचे स्टॉल दिसले की गर्दी होतेच. पण, लोकल ट्रेनच्या ट्रेनच्या गर्दीत पाणीपुरी खायला मिळाली तर? अशक्य वाटतयं ना? पण एका विक्रेत्याने हे शक्य करुन दाखवले आहे.  धावत्या लोकलमध्ये  एक फेरीवाला पाणीपुरी विकत आहे. प्रवाशी धावत्या लोकलट्रेनमध्येच पाणीपुरीचा आस्वाद घेत आहे. लोकल ट्रेनमध्ये पाणीपुरी विकणाऱ्या या विक्रेत्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुबंई लोकल ट्रेनमध्ये फेरीवाले विविध वस्तू विकत असतात. मात्र, लोकल ट्रेनमध्ये पाणीपुरी विकून एका विक्रेत्याने सर्वांनाच आश्चर्यचकित करुन टाकले आहे. लोकल ट्रेनमध्ये पाणीपुरी विकरणाऱ्या या विक्रेत्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.  @sagarcasm नावाच्या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.  या व्हिडिओला 403.8K Views आले आहेत. तर, 4,905 Likes, 340 Retweets, 144 Bookmarks आणि हजारो कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. 


काय आहे या व्हिडिओमध्ये?


हा व्हिडिओ लगेज डब्यातील आहे. लगेज डब्यात एक पाणीपुरी विक्रेता पाणीपुरी विकताना दिसत आहे. ट्रेनमध्ये प्रवाशांची चांगलीच गर्दी दिसत आहे. या गर्दीतही विक्रेता मोठ्या चपळाईने पाणीपुरी देत आहे. प्रवासी देखील मोठ्या आवडीने धावत्या लोकलमध्ये पाणीपुरीचा आस्वाद घेताना दिसत आहेत. प्रवाशांच्या आवडीनुसार गोड आणि तिखट अशी पाणीपुरी हा विक्रेता देत आहे. 


व्हिडिओ नेमका कुठला?


हा व्हिडिओ मुंबई लोकल ट्रेनमधील असल्याचा दावा केला जात आहे. तर, अनेकजण हा व्हिडिओ मुंबई नाही तर कोलकताच्या लोकल ट्रेनमधील असल्याचे म्हणत आहेत. लोकल ट्रेनमध्ये पाणीपुरी विकणाऱ्य़ा या तरुणाने सर्वांनाच थक्क केले आहे. 



नवी मुंबईतील वाशी स्टेशनमधील टॉयलेटमध्ये  पाणीपुरीचा स्टॉल?


नवी मुंबईतील वाशी स्टेशनमधील टॉयलेटमध्ये  पाणीपुरीचा स्टॉल ठेवल्याचा व्हिडिओ झाला होता. वाशी रेल्वे स्थानकाच्या शौचालयामध्ये पाणीपुरी ठेवलेली आढळल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. एक शीतपेयाची मशीन आणि त्यावर पाणीपुरीच्या पु-या ठेवल्याचं आढळल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचं समोर आले. प्रवाशांच्या तक्रारीनंतर या पाणीपुरी विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली.