अनिरुद्ध ढवाळे, झी मीडिया, अमरावती : सध्या पतंग उडवण्याचा हंगाम सुरु झाला आहे. मात्र, पतंग उडवण्याचा हा आनंद पक्षी आणि मुक्या जनावरांसाठी जीवघेणा ठरत असताना आता मानवांसाठी देखील धोकादायक ठरत आहे. चायना मांजावर बंदी (china manja Ban) असताना देखील मोठ्या प्रमाणात पतंगबाजीसाठी याचा वापर केला जात आहे. अमरावतीमध्ये(Amtavati ) चायना मांजाने तरुणाचा गळा कापला गेला आहे. यात हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला  80 टाके पडले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात रमेश धुर्वे 36 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे.  रमेश हा अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील राहणारा आहे. अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डॉ. श्रीकांत महल्ले व त्यांच्या चमूनी तातडीने उपचार केल्याने  रमेशचा जीव वाचला आहे. मात्र, यात रमेशच्या मानेला गंभीर इजा झाल्याने त्याला मानेच्या स्क्रीनच्या आत मध्ये तब्बल 50 टाके तर मानेवर 30 असे एकून 80 टाके पडले आहेत. 


रमेश हा आपल्या बाईकने बडनेरा येथून अमरावती शहरात येत होता. दरम्यान रस्त्यावर दुचाकी चालवत असतांना चायना मांजाने त्याचा गळा कापला गेला. यात तो गंभीररीत्या जखमी झाला. जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याच्या मानेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याची प्रकृती आता स्थिर असून अतीदक्षता कक्षात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.  मात्र, बंदी घालण्यात आलेल्या चायना मांजाची विक्री सर्रास होताना दिसत आहे.