Pune Crime News : पुण्यातील दर्शना पवार हत्येप्रकरणा खळबळ उडाली असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. बॉयफ्रेंडला भेटायला गेलेल्यातरुणीवर बॉयफ्रेंडच्या मित्रांनीच सामुहिक बलात्कार केला आहे. पुण्यातील आंबेगाव तालुक्यात ही घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली आहे. 


विवाहीत महिलेवर प्रियकराच्या मित्रांचा अत्याचार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संदेश जाधव,संजय,आदेश जाधव,आणि चंद्रकांत भालेराव अशी अत्याचार करणा-या नराधमांची नावे. पिडित महिलेच्या तक्रारीवरुन घोडेगाव पोलीस ठाण्यात या चौघांविरोधात तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. 


नेमकं काय घडलं?


पीडीत महिला 22 वर्षांची आहे. ही महिला वीवाहित आहे. तिचे एका तरुणासह प्रेमसंबध आहेत. प्रियकराने तिला भेटायला बोलवले होते. यावेळी प्रियकराच्या चार मित्रांनी  डोंगराळ भागातील जंगलात निर्जनस्थळी  नेऊन  अत्याचार केला. जीवे मारण्याची धमकी देत या चौघांवनी बलात्कार केल्याचे महिलेने पोलिस तक्रारीत म्हंटले आहे. 


लग्नाला नकार दिल्याने केली दर्शनाची हत्या


एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हत्या प्रकरणातल्या मुख्य आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केल्यानतर हत्याचे उलगडा झाला. मुंबईतून राहुल हंडोरेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. लग्नाला नकार दिल्यानं राहुल हंडोरेने दर्शनाची हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. दर्शना पवार ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातून सहावी आली होती.  18 जून रोजी दर्शनाचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी सापडला होता. 


विहीरीत तरंगताना आढळला महिलेचा मृतदेह


भंडारा जिल्ह्याच्या पालोरा येथ एका विहीरीत महिलेचा मृतदेह  तरंगताना आढळला आहे.  शालीनी चरणदास तिरपुडे (वय 52 वर्षं) असे मृत महिलेचे नाव आहे. षालीनी या आशा वर्कर आहे. शुक्रवारी घरातून बाहरे पडलेल्या शालीनी घरी परतल्याच नव्हत्या. त्यांच्या बहिणीने त्यांचा शोध घेतला. गुरे चरायला गेलेल्या नागरीकांना विहिरीजवळ चप्पल आणि स्कार्फ दिसल्याने विहिरीजवळ जाऊन पाहिले असता विहीरीत शालीनी यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला. याची माहिती करडी पोलिसाना देण्यात आली.  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याबाहेर काढला. शालीनी यांनी आत्महत्या केली असावी अस प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आत्महत्येचा कारण अद्याप समजू शकलेले नाही.