नितेश राणे ऑडिओ क्लिपप्रकरणी रुपाली पाटील यांच्यावर कारवाईची मागणी
रुपाली पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने करण्यात आलीय.
मुंबई : आमदार नितेश राणे यांच्या ऑडिओ क्लिपप्रकरणी रुपाली पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने करण्यात आलीय. याप्रकरणी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केलीय. या ऑडिओ क्लिपमुळे मराठा संघटना आक्रमक झाल्यात. या ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळण्याची मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी केलीय.