5 वर्षापूर्वी हरवलेला दिव्यांग मुलगा, `या` महत्वाच्या पुराव्यामुळे कुटूंबाला सापडला
Aadhar Card मुळे 5 वर्षांपासून आपल्या कुटुंबापासून भरकटलेल्या दिव्यांग मुलगा त्यांच्या कुंटूंबियांना सापडला आहे. जळगाव रेल्वे स्थानकावरून मुलगा हरवला होता. तो मुलगा थेट जबलपूर येथे पोहचला.
जळगांव : aadhaar success story : आधार कार्ड केवळ सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त नाही. तर हरवलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्यासाठीही महत्वाचा ठरीत आहे. असाच एक प्रकार जबलपूरमधून समोर आला आहे. 2017मध्ये एक दिव्यांग मुलगा आपल्या कुटूंबापासून हरवला होता. आता सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने तो पाच वर्षानंतर पुन्हा कुटूंबाला भेटणार आहे.
दिव्यांग मुलगा पोहचला जबलपूरला
5 वर्षांपासून लालू नावाचा मुलगा जबलपूर येथील सरकारी दिव्यांग बालगृहात राहत आहे. हा मुलगा 10 जून 2017 रोजी जळगाव रेल्वे स्थानकातून बेपत्ता झाला होता. तो ट्रेनमध्ये बसून जबलपूरला पोहोचला होता. 23 जून 2017 रोजी हरवलेल्या या दिव्यांग मुलाला चाइल्ड हेल्पलाइनच्या सदस्यांनी बालसुधारगृहात नेले. तेथे त्याची काळजी घेण्यात आली.
लालूचं खरे नाव अनस शेख आहे. बालवाडीत त्याला लालू हे नाव देण्यात आलं होतं. आता लालू 17 वर्ष 10 महिन्यांचा आहे.
घरच्यांचा पत्ता मिळाला
काही काळापूर्वी अनसची आधार कार्ड बनवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. आधारच्या नोंदणीमुळे आधार विभागाशी संपर्क साधून अनसच्या कुंटूंबियांची माहिती घेण्यात आली.
आधार कार्ड सेवेचे जबलपूर प्रभारी चित्रांशु त्रिपाठी आणि बालगृह अधीक्षक रामनरेश यांच्या प्रयत्नाने अनसचे कुटुंबीय सोमवारी जबलपूरला पोहोचले. आता प्रशासकीय कारवाईनंतर अनसला कुटूंबियांच्या त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.