पुणे : पुणे जिल्हा प्रशासन तसंच महापालिकेच्या वतीनं शहरात आधार नोंदणी आणि दुरुस्तीसाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. मात्र, या मोहिमेतही प्रचंड गोंधळ अनुभवयाला मिळाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधार कार्डसाठी कित्येक महिने त्रासलेल्या नागरिकांना यावेळीही मनस्तापच सोसावा लागला. पुणे शहर तसंच जिल्ह्यातील आधार केंद्र कित्येक महिने बंद असल्यानं नागरिक त्रस्त आहेत. 


दुस-या बाजूला कुठेही गेलं तरी आधाराशिवाय काम होत नाही. त्यामुळे आधारपायी वणवण भटकण्याची वेळ नागरिकांवर आलीय. मात्र, त्यांना दिलासा देण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचं म्हणावं लागेल.