महाराष्ट्र दिनानिमित्त किरण राव आणि आमीर खानचं श्रमदान
आमीर खान, किरण राव यांचं गावकऱ्यांकडून मोठ्या उत्साहात स्वागत
सातारा : महाराष्ट्र दिनानिमित्त आमीर खान, किरण राव आणि संपूर्ण पाणी फाऊंडेशनची टीम पोहोचली. सातारा जिल्ह्यातल्या चिलेवाडी गावात आमीर खान, किरण राव यांचं गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं. ग्रामस्थांसह या दोघांनीही श्रमदानात भाग घेतला. पाणी फाऊंडेशनच्या या उपक्रमात बॉलिवूड, मराठी कलाकारांसह हजारो लोकं देखील सहभागी होत असतात.
आमीर आणि किरण रावला काम करताना पाहून गावकऱ्यांमध्ये देखील प्रचंड उत्साह निर्माण झाला होता. दुष्काळ मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आमीर खान आणि पाणी फाऊंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्राचं आमीर खानचं स्वप्न आहे. महाराष्ट्र दुष्काळमुक्त व्हावा म्हणून स्पर्धेच्या माध्यमातून आमीर खान आणि त्याची संस्था काम करत आहे.