प्रफुल्‍ल पवार, झी मीडिया, अलिबाग : करोडो रूपयांचा घोटाळा करून फरार असलेला हिरे व्‍यापारी नीरव मोदी याच्‍या देशभरातील मालमत्‍तांवर गंडांतर आले असताना अलिबाग तालुक्‍यातही त्‍याची कोटयवधी रूपयांची मालमत्‍ता असल्‍याचं समोर आलं आहे. 


मालमत्‍तेविषयी तपशील


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलिबाग तालुक्‍यातील किहीम येथे नीरव मोदीची मालमत्‍ता आहे. साधारण ७० गुंठे म्‍हणजे पावणे दोन एकरचे फार्म हाउस आहे. त्‍यामध्‍ये ३ गुठे ७६ पॉइंट जागेवर अलीशान शेतघर हे १९८५ मध्‍ये बांधलेले आहे.


किती आहे किंमत


मालमत्‍ता ही सामाईक असून त्‍यामध्‍ये नीरव मोदीचा हिस्‍सा ६३ गुंठे ३९ पॉइंट तर सिराज भोलुभाय याचा हिस्‍सा ७ गुंठे ११ पॉइंट आहे. स्‍थानिक बाजारभावाप्रमाणे या एकूण मालमत्‍तेची अंदाजे किंमत पावणेचार कोटी रूपये इतकी आहे.