वर्धा : सेलसुरा येथे  (Maharashtra) काल रात्री भीषण अपघात झाला. कार पुलावरुन खाली पडली आणि या अपघातात भाजप आमदार विजय रहांगडाले  (Vijay Rahangdale) यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले (Avishkar Rahangdale) याच्यासह सहा वैद्यकीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. कार पुलावरुन खाली कोसळली. मिळालेल्या माहितीनुसार, वैद्यकीय विद्यार्थी रात्रीचे जेवण करुन वर्ध्याला जात होते. पुलावरुन कार जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार  फूट खोल कोसळली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला.


भाजप आमदाराच्या मुलाचा अपघाती मृत्यू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजय रहांगडाले हे महाराष्ट्रातील तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. पुलावरुन कोसलेल्या वाहनात आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले होता. या अपघातात अविष्कार रहांगडाले यांचा मृत्यू झाला. आविष्कार रहांगडाले हा वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. या दुर्घटनेत आविष्कार रहांगडाले यांच्यासह इतर सहा वैद्यकीय विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाला आहे.


मध्यरात्री कार नदीत कोसळून अपघात, मेडिकलचे 7 विद्यार्थी ठार



पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले दु:ख 


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. वर्धा येथे झालेल्या या अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.



वर्ध्याचे एसपी प्रशांत होळकर यांनी सांगितले की, काल रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास वर्ध्यातील सेलसुराजवळ ही घटना घडली. अपघात ठार झालेले वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी वर्ध्याला जात होते. मात्र त्यांची कार वाटेत पुलावरुन खाली कोसळली.