वर्धा : Wardha car crash: सेलसुरा येथे मध्यरात्री कार पुलावरुन नदीत कोसळून कारला मोठा अपघात झाला. (Car accident) या अपघातात सात तरुणांचा मृत्यू झाला. यवतमाळ येथून कारने सात जण वर्धा येथे येत होते. यावेळी भरधाव येणाऱ्या गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातामध्ये गाडीचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला होता. गाडीच्या सांगाड्यावरुन अपघाताची भीषणता स्पष्ट होत आहे.(7 medical students killed in car crash in Wardha)
अपघातात ठार झालेले तरुण हे वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे सात तरुण हे यवतमाळ येथून वर्ध्याला येत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, नदीच्या पुलावरुन गाडी जात असताना ती नियंत्रित न झाल्याने गाडी पुलावर खाली कोसळली. या गाडीतील सात जणांचा जागीच झाला मृत्यू झाला. या अपघातात गाडी पूर्ण चेंदामेंदा झाला. रात्रीची वेळ असल्याने अपघाताची माहिती मिळाली नव्हती. मात्र, मोठा आवाज झाल्यानंतर परिसरातील स्थानिक लोकांना पाहिल्यानंतर अपघात झाल्याचे समजले. मात्र, तोपर्यंत तरुणांना वाचविण्याचा शक्यता कमी झाली होती.
वर्ध्या येथील सेलसुरा येथील घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या अपघात ठार झालेल्यांमध्ये एका आमदाराचा मुलगा असल्याची माहिती मिळत आहे. अपघात ठार झालेले तरुण हे दत्ता मेघे मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. दरम्यान, नदीपात्रातील या तरुणांचे मृतदेह स्थानिक गावकरी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने काढले बाहेर काढण्यात आले आहेत. मात्र, गाडीचा चेंदामेंदा झाल्याने काहींना बाहेर काढता येत नव्हते.
कार अपघातातील मेडिकलच्या विद्यार्थ्यांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. सातही विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर या अपघाताने मोठा आघात झाला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.