जळगाव : धुळे जिल्ह्यात एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा गावाजवळील महामार्गावर अपघात झाला. या अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. ट्रक आणि कालीपिलीची धडक झाल्यामुळे हा दुर्दैवी अपघात झाल्याचे समोर येत आहे. या अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचा ट्रकवरील नियंत्रण सुटले अणि दुर्दैवी अपघात झाला. एरंडोल शहरापासून सहा किलोमीटर असलेल्या हॉटेल गौरी जवळ अपघात झाला. 


सविस्तर वृत्त थोड्याचवेळात