रायगड : मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर ट्रक ने पेट घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा पेटता ट्रक पुलावरून खालच्या रस्त्यावर कोसळला. ताकई ते आडोशी दरम्यानच्या पुलावर हा अपघात घडला. यामध्ये ट्रकचा चालक सुरक्षित आहे. अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य वेगाने सुरु आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज सकाळी रसायनाने भरलेल्या टँकरने अचानक पेट घेतला. या आगीची झळ एका ट्रेलरला लागली. ही घटना ताकइ आडोशी दरम्यानच्या पुलावर घडली. आग लागलेला ट्रेलर या पुलावरून खाली कोसळला. टँकरला लागलेल्या आगीने मात्र मोठे रूप धारण केले. टाटा स्टील, भूषण स्टील,  आयएनएस शिवाजी येथील अग्निशमन यंत्रणा काम करत आहे. आग विझवण्यासाठी फोमचा मारा सुरू असून आग नियंत्रणात आली आहे. सुदैवाने आगीत कोणतीही जीवित हानी झाल्याचं वृत्त नाही.


मुंबई-पुणे एक्सप्रेसवर मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत सुरु आहे. मुंबईकडे येणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर तीन ते चार किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. 



मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर एका टँकरला प्रथम आग लागली. या टँकरमध्ये रसायन होते. या आगीची झळ बसून एका ट्रकने पेट घेतला आणि तो ट्रक खाली कोसळला. टँकरला लागलेल्या आगीमुळे एक्सप्रेस वे वरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.