Video : महामार्गावर भीषण अपघात, थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद
ओव्हरटेक करु (Overtaking) नका, असं वाहतूक विभागाकडून वारंवार (Traffic Department) सांगितलं जातं.
चैत्राली राजपूरकर, झी मीडिया, पुणे : ओव्हरटेक करु (Overtaking) नका, असं वाहतूक विभागाकडून वारंवार (Traffic Department) सांगितलं जातं. मात्र त्यानंतरही अनेक जण बिंधास्तपणे या नियमांना पायदळी तुडवतात. ओव्हरटेक करताना दुर्देवाने गाडीवरचा ताबा सुटतो आणि नको ते घडतं. असाच थरकाप उडवणारा भीषण (Accident) अपघात झालाय. या अपघातात बाईकस्वार गंभीर जखमी झालाय. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. (accident of a biker overtaking a container on talegaon chakan highway at maval)
नक्की काय घडलं?
हायवेवर कंटेनरला एक बाईकस्वार भरधाव वेगात ओव्हरटेक करत होता. त्याचवेळी समोरून कार येत होती. त्या येणाऱ्या कारवर तो बाईकस्वार धडकला. समोरासमोर कार आणि बाईकची जोरदार टक्कर झाली. अपघाताची दृश्य सीसीटीव्हीत चित्रीत झाली आहेत.
हा अपघात शनिवारी 20 ऑगस्टला दुपारी 4 वाजता झाला. अपघातात बाईकस्वार गंभीर जखमी झालाय. त्याला रूग्णालयात भरती करण्यात आलंय. ही सर्व थरारक घटना तळेगाव ते चाकण महामार्गावर मावळ जवळ घडलीय.