लातूर : नांदेड रस्त्यावर लातूरपासून पाच किलोमीटर अंतरावरील कोळपा गावाजवळील एका पुलाच्या कडेला आज पहाटे साडेचार वाजता हा अपघात झालाय. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले. रेल्वेने आलेल्या प्रवाशांना घेऊन एक क्लूजर वाहन लातूरला येत होते. त्यात चालकासह दहाजण होते. 


कसा झाला अपघात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वाहनाने कोळपा गावाजवळील एका पुलाच्या कडेला उभारलेल्या आयशर टेम्पोला समोरून जोराची धडक दिली. याच वेळी समोरून येत असलेल्या दुसऱ्या क्लुजर वाहनालाही धडक दिली. या अपघातात लातूररोडहून आलेल्या क्लूजर वाहनाचे वरील छत पूर्ण फाटले व वाहनाचा चक्काचूर झाला. त्यातील सात जण जागीच ठार झाले तर चारजण जखमी झाले. यासोबत दुसऱ्या क्लूजरमधील नऊजण जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर सर्वोपचार रूग्णालयात उपचार सुरू आहेत.



मृतांची नावे


अपघातातील मृतांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. विजय तुकाराम पांदे (वय ३०, रा. दापूर, ता. सिन्नर, जि. नाशिक), तुकाराम ज्ञानोबा दळवे (वय ३५, रा. दापेगाव, ता. औसा), उमाकांत सोपान कासले (वय ४०), मीना उमाकांत कासले (वय ४०, दोघेही रा. रेणापूर नाका, लातूर), शुभम शरद शिंदे (वय २४, रा. बेलपिंपळगाव, ता. जि. अहमदनगर), मनोज चंद्रकांत शिंदे (वय २५, रा. वैशालीनगर, बाभळगाव) व दत्तू बळीराम शिंदे (वय ३५, रा. हिंपळनरी, ता. मुखेड, जि. नांदेड). असे मयत आहेत.