बंद कारला ढकलताना टेम्पोनं दिली धडक, पाच ठार
मानखुर्दवरून पुण्याला एका लग्नाला जाण्यासाठी आठ मित्र ओमानी कार घेऊन पहाटे निघाले होते
पनवेल : पनवेलजवळ मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पहाटे पाच वाजता झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झालाय. पुण्याहून मुंबईच्या दिशेने येताना आदई गावाजवळ एका भरधाव टेम्पोनं ओमनी गाडीला मागून जोरदार धडक दिली. अपघातानंतर तीन जणांचा जागीच मृत्यू झाला... तर आणखी दोघांचा रुग्णालयात उपचारा दरम्यान जीव गेला. उरलेल्या जखमींवर पनवेलमधील कामोठ्यातल्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मानखुर्द वरून पुण्याला एका लग्नाला जाण्यासाठी आठ मित्र ओमानी कार घेऊन पहाटे निघाले होते , पनवेल पासून पुढे सहा किलोमीटर अंतरावर ओमानी कार बंद पडली. ती दुरुस्त करण्यासाठी पुन्हा पनवेल च्या दिशेने निघाले. गाडीला धक्का मारत हे मित्र पनवेल च्या दिशेने येत असताना आदई टोल नाक्या जवळ पाठून येणाऱ्या क्लिगडाने भरलेल्या टेम्पोने या कारला धडक दिली यात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले. यातील दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला, या अपघातात पाच मृत पावले , हे सर्व मानखुर्द येथील रहिवासी असून, त्याची नवे पुढील प्रमाणे...
1) संतोष प्रजापती
2) रशीद नफिज खान
3) जुंमन शौरतअली शेख
4) दिनेश जैस्वाल
5) अयोध्या यादव
तर, रामचंद्र यादव या अपघातात गंभीर जखमी झालेत. संजय छोटेलला राजभर आणि मुंद्रिका प्रसाद जैस्वाल हेदेखील या अपघातात जखमी झालेत. जखमींवर कामोठे एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.