सतीश नाईक, झी मराठी, नांदेड : नांदेड शहरात भरदिवसा व्यापा-र्याला बंदूकीचा धाक दाखवून 15 लाख रुपये लुटणाऱ्या आरोपीना पोलीसांनी अटक केली आहे. आरोपींकडून लूटीतील काही रुक्कम जप्त करन्यात आली असून 2 आरोपी अजून फरार आहेत. 10 मे रोजी लूटीची ही घटना घडली होती. नवा मोंढा एथील ओम ट्रेडिंगचे मालक ओम बोरलेपवार हे 15 लाख आणि काही चेक घेऊन चिखलवाड़ी एथील बँकेत भरण्यासाठी आपल्या दुचाकिवरुन जात होते. नवा मोंढा येथून दुचाकीवर ट्रिपल सीट असलेल्या तिघांनी त्यांचा पाठलाग केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बोरलेपवार हे हिंगोली गेट उद्दानपुलावर आले असतांना त्यांना आरोपीनी बंदूक दाखवून थांबवले. बंदूकीचा आणि शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील 15 लाख रूपयांची बॅग हिस्कावण्याचा प्रयक्त केला. बोरालेपवार यांनी प्रतिकार करण्याचा प्रयक्त केला. झटापटीत बॅगेचा बंदही तुटला होता. पण चाकुने मारण्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून बॅग हिस्कावून चोरटे दुचाकीवर धूमस्टाईल फरार झाले. चोरटे चिखलवाड़ी च्या दिशेने फरार झाले होते. चोरटे शहरातील काही सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले. त्यावरून पोलीसांनी तपास सुरु केला.



बोरलेपवार यांच्याकडे मोठी रक्कम असल्याची चोरटयांना माहिती नेमके कशी भेटली याचा पोलीसांना संशय आला. पण बोरलेपवार यांनी दुकानातील नोकरावर संशय नसल्याचे सांगितले. पोलीसांनी  दुकानातील नोकरांची चौकशी करुन पाळत ठेवली होती. दुकानातील नोकर आणि त्यांच्या मित्रांची पोलीसानी माहिती घेतली. दुकानातील नोकर उमेश यादव यात सहभागी असल्याचा सुगावा लागला. नोकर उमेश यादव याचे काही आरोपीशी संबंध असल्याचे पोलीसांना समजले.


घटनेतील आरोपी पैसे घेऊन परराज्यात पळाले होते.  पोलीसानी लूट करणाऱ्या 2 आरोपीना पर राज्यातुन अटक केली. नोकर उमेश यादव, शेख अतीक शेख मेहमूद,सोनू यादव, सचिन सूर्यवंशी या 4 आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर आणि त्यांच्या पथकाने अटक केली. आरोपींकड़ून आतापर्यंत 3 लाख 40 हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. कटातील 2 आरोपी अद्याप फरार असुन त्यांचा शोध सुरु असल्याचे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी सांगितले. शहरात भरदिवसा व्यापा-याला बंदूकीचा धाक दाखवून लुटल्याने खळबळ उडाली होती. परंतु पोलीसांनी 15 दिवसात आरोपींच्या मुसक्या आवळल्याने व्यापारी वर्गातुन समाधान व्यक्त होत आहे.