Pune Bomb Blast : साखळी बॉम्बस्फोटातील आरोपीला हायकोर्टाकडून दुसऱ्यांदा जामीन मंजूर
Pune Bomb Blast : 2012 साली झालेल्या बॉम्बस्फोटानंतर आरोपीला अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर आरोपीला जामीनावर सोडण्यात आले होते. मात्र पुन्हा अटक झाल्याने आरोपीने जामीनासाठी अर्ज केला होता.
Pune Bomb Blast : पुण्यात जंगली महाराज रोडवर (jagali maharaj road bomb blast) झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपीला दुसऱ्यांदा जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई हायकोर्टाने (Mumbai High court) आरोपी असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदारला हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 2013 मध्ये जहागीरदारला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता तिसऱ्यांदा जहागीरदारला हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 1 ऑक्टोबर 2015 रोजी पहिल्यांदा हायकोर्टाने जामीन त्याचा जामीन मंजूर केला होता. मात्र जामीनाच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी हायकोर्टाने तो रद्द केला. मात्र आता पुन्हा बंटी जहागीरदारला जामीन मिळला आहे.
जंगली महाराज रस्त्यावर पाच बॉम्बस्फोट
इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी 1 ऑगस्ट 2012 रोजी जंगली महाराज रस्त्यावर पाच बॉम्बस्फोट घडवून आणले होते. या बॉम्बस्फोटातील आरोपी इरफान लांडगे याला बंटीने हत्यार पुरविल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) या बॉम्बस्फोट प्रकरणात आठ जणांना अटक केली होती. यामध्ये मुनीब इक्बाल मेमन, असद खान, इम्रान खान, सय्यद फिरोज, इरफान मुस्तफा लांडगे, फारुख बागवान, काशिफ बियाबानी आणि असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार यांचा समावेश होता.
अटक, जामीन आणि सुटका
1 ऑक्टोबर 2015 रोजी हायकोर्टाने बंटी जहागीरदार याचा जामीन मंजूर केला होता. प्रथमदर्शनी कथित कटाशी त्याचा संबंध दूरगामी होता. 2012 मध्ये पुण्याच्या येरवडा तुरुंगात आणखी एका अंडरट्रायल कतील सिद्दिकीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी जहागीरदारने बंदुक विकल्याचा आरोप राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने केला होता असे कोर्टाने म्हटले होते. त्यामुळे जहागीरदारला अटी व शर्तींवर जामीन मंजूर करण्यात आला. अटींनुसार जामीनावर असतानाही जहागीरदार दहशतवादविरोधी पथकाच्या पोलीस ठाण्यात हजर रहात नव्हता. त्यामुळे महाराष्ट्र एटीएसने जहागीरदार याच जामीन रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर जहागीरदार याचा जामीन रद्द करण्यात आला. जामीन रद्द होताच जहागीरदार दहशतवादी पथकासमोर शरण आला होता.
त्यानंतर जहागीरदारने 2020 मध्ये पुन्हा जामीनासाठी अर्ज केला होता. त्यानुसार त्याला आता हायकोर्टाने जामीन मंजूर झाला आहे. "आरोपीने 6 वर्षांचा कारावास अंडरट्रायल म्हणून भोगला आहे. आरोपीला ट्रायल कोर्टाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत अधिक काळ तुरुंगात ठेवणेची आवश्यकता नाही," असे निरीक्षण न्यायमूर्ती ए एस गडकरी यांच्या एक सदस्य खंडपीठाने नोंदवले आहे.
पुणे महापालिकेच्या 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत बंटी जहागीरदार याच्या आई रजियाबी जहागीरदार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. मात्र 2019 साली रजियाबी जहागीरदार यांचे निधन झाले होते. बॉम्बस्फोटाती आरोपी असलेल्या इरफान मुस्तफा लांडगे याला जहागीरदारने बंदुक पुरवल्याचा आरोप करण्यात आला होता. दोन वर्ष आधी जहागीरदारने याने बंदुक पुरवली होती. मात्र त्याचा वापर बॉम्बस्फोटात झाला नव्हता. पण आरोपीसोबत संबंध असल्याने जहागीरदार याला अटक करण्यात आली होती.