अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील घोडनदी पात्रात सुरु असलेल्या अवैध वाळु उपसा करणा-या विरोधात श्रीगोंदा तहसीलदार महेंद्र माळी यांनी धडाकेबार कारवाई सुरु केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलग दोन दिवस घोडनदी पात्रात कारवाई करत वाळु उपसा करणा-या सात यांत्रिक बोटी ब्लास्ट करुन उद्धवस्त करण्यात आल्यात. यात वाळू तस्कारांचे जवळपास ४२ लाख रुपयांचं नुकसान झालंय. अवैध वाळू उपसा करणारे पोलीस, महसूल कर्मचाऱ्यांची चाहुल लागताच बोटी सोडून पळून जातात. त्यामुळे वाळू तस्कारांवर आळा घालण्यासाठी बोटी नष्ट करण्याचे धोरण महसूल विभागाने अवलंबलंय.