अमरावती : अवैध वाळू उपसा करणाऱ्या तब्बल ९२ ट्रकवर पोलिसांनी कारवाई केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कारवाईत सुमारे दोन कोटींची वाळू जप्त करण्यात आलीय. वर्धा आणि अमरावती जिल्ह्याची सीमा असलेल्या बोरगाव धांदे परिसरातल्या रेती घाटावर रात्रीपासून पहाटेपर्यंत वाळू उपसा सुरू असायचा.


अमरावती जिल्हा विशेष शाखेचे परीविक्षाधीन अधिकारी समीर शेख यांनी ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ही कारवाई केलीय. पहाटे पाच वाजता त्यांनी विशेष पथकासह रेती उत्खननावर कारवाई केली़.


या कारवाईत तब्बल ९२ ट्रक पकडण्यात आलेत. ताब्यात घेतलेल्या ट्रकची पुलगाव ते देवगाव रस्त्यावर अडीच किलोमीटरपर्यंत रांग  लागली होती. तीन पोकलेन, दोन डोंगी जप्त करण्यात आल्यात.