दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुरुडमध्ये पॅरासिलिंग करताना दोर तुटून १५ वर्षाच्या युवकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे विधानसभेत सांगण्यात आले. तसेच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत विधानसभेत आज लक्षवेधी मांडण्यात आली. पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी यासंदर्भात माहीती दिली. तसेच जीवरक्षक तैनात असूनही अपघात होत असल्याची कबुली यावेळी राज्यमंत्र्यांनी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जीपद्वारे केल्या जाणाऱ्या पॅरासिलिंगला परवानगी नसल्याचे यात स्पष्ट करण्यात आले. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारी सुरू असलेले साहसी क्रीडाप्रकारांना परवानगी नसल्याचेही युवकाच्या मृत्यूची एक महिन्यात चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी विधानसभेत यासंदर्भात माहिती दिली. 



समुद्रकिनारी अपघात होऊ नयेत यासाठी सरकार कठोर पावलं उचलणार आहे. तसेच समुद्रकिनारी सुरक्षा रक्षक आणि जीवरक्षक तैनात असूनही अपघात होत असल्याची कबुली राज्यमंत्र्यांनी दिली.