बॉलिवूडचा `टारझन` हेमंत बिर्जे याच्या कारला महामार्गावर अपघात, पत्नीही जखमी
Actor Hemant Birje`s car accident on the highway : बॉलिवूडचा अभिनेता हेमंत बिर्जे याच्या गाडीला मोठा अपघात झाला.
मुंबई : Actor Hemant Birje's car accident on the highway : बॉलिवूडचा अभिनेता हेमंत बिर्जे याच्या गाडीला मोठा अपघात झाला. उर्से टोल प्लाझाजवळ रात्री आठच्या सुमारास ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातात त्याच्यासह त्याची पत्नी जखमी झाली. हा अपघात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मंगळवारी रात्री झाला. अभिनेता हेमंत बिर्जे (Hemant Birje) यांची कार रस्ता दुभाजकावर आदळली, त्यात ते आणि त्यांची पत्नी जखमी झाली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मुलीला दुखापत झालेली नाही
या अपघातात बिर्जे दाम्पत्याला किरकोळ दुखापत झाली, तर त्यांच्या मुलीला कोणतीही दुखापत झाली नसल्याचे शिरगाव पोलिस चौकीचे निरीक्षक सत्यवान माने यांनी सांगितले. हेमंत बिर्जे आणि त्यांच्या पत्नीवर पुण्याजवळील पवना येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
बॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट
हेमंत याने बॉलिवूडला 'अॅडव्हेंचर्स ऑफ टारझन' हा सुपरहिट चित्रपट दिला आहे. या चित्रपटाने त्या काळात यशाचे अनेक विक्रम मोडले. आजही लोक हेमंतला 'टारझन' या नावानेच आठवतात.
या चित्रपटांमध्ये काम केले
'अॅडव्हेंचर्स ऑफ टारझन' नंतर हेमंत बिर्जे यांनी आज के अंगारे, वीराणा, तहखाना, सिंदूर और बंदूक, सौ वर्ष बाद, आज के शोले, जंगली टारझन, लष्कर, इके पे इक्का अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले, पण टारझन या सिनेमानंत त्यांना मोठे यश मिळाले नाही. हेमंत बिर्जे यांच्या चित्रपटांना संमिश्र प्रतिसाद मिळत होता. एक वेळ अशी आली की त्यांचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले.