Marathi Celebrity on Maharashtra Political Crisis: आज महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा भूकंप पाहायला मिळतो आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र चर्चांना वर चर्चा सुरू झाल्या आहेत. अशाच आता घडलेल्या घडोमाेडींवर ज्याप्रमाणे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे त्याच प्रमाणे मराठी मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनाही यावर आपली मतं मांडली आहेत. अनेकांनी ट्विटवर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. आतापर्यंत अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमे, अभिनेता स्वप्निल जोशी, अभिनेत्री तेजस्विनी पंडित, गायक उत्कर्ष शिंदे यांनी आपली मतं ट्विटरवरून शेअर केली आहेत. त्यामुळे सध्या या घटनेवरून जनमानसात त्याचप्रमाणे सेलिब्रेटींमध्ये धुरळा उडाला आहे. या कलाकारांच्या ट्विटवर चाहत्यांनीही नाना तऱ्हेच्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत. नक्की हे कलाकार काय म्हणाले आहेत आणि त्यांच्या या ट्विटवर नक्की कोणत्या कोणत्या प्रतिक्रिया आल्या आहेत या लेखातून जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनं एक ट्विट केलं आहे ज्यात तिनं म्हटलं आहे की, “तत्वनिष्ठ, सार्वभौम विचार आणि महाराष्ट्रावर अपार प्रेम अशाच माणसाने आता महाराष्ट्रावर ‘राज’ करावं. – महाराष्ट्राचा भरडलेला नागरिक,” त्याचसोबत पुढे तिनं हॅशटॅग दिला आहे की #महाराष्ट्रआतातरीजागाहो हे. तिच्या या ट्विटखाली चाहत्यांनी अनेक प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत.



अनेकांनी राज ठाकरेंचे नाव घेत त्यांनी राजकारणात उतरावं असं म्हटलं आहे. त्याचसोबत तिनं अजून एक ट्विट केलं आहे ज्यात तिनं म्हटलं आहे की, ''भेळ हवीये भेळ ???? सर्वोत्तम भेळ आमच्या महाराष्ट्रात मिळेल !!!!'' त्याचसोबत त्यापुढे तिनं #Maharashtrapolitics असा हॅशटॅगही टाकला आहे. 



अभिनेता स्वप्निल जोशीनंही आपलं एक ट्विट जारी केलं आहे, ज्यात त्यानं म्हटलंय की, ''उत्तम पटकथा लिहिण्याची कला'' त्यामुळे त्याच्या या ट्विटची चांगली चर्चा रंगली आहे. अनेकांनी लिहिलंय की, ''तूम्हीही यावर असाच एक चित्रपट करा जो खूप चालेल.''



'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनीही एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्यांनी म्हटलंय की, ''महाराष्ट्रात सर्व पक्षीय राजवट..भा ज पा, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भा ज पा तील काँग्रेसी नेते एकत्र येऊन महाराष्ट्र घडवणार…(मतदारांची ऐशी तैशी..)”. त्यांच्या पोस्ट खालीही नानातऱ्हेच्या कमेंट्स येताना दिसत आहेत. 



तर गायक आदर्श शिंदेचा भाऊ आणि 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेता उत्कर्ष शिंदे यांनंही एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात तो म्हणतो की, ''मतदात्याच्या बोटाला शाही नाही आता चुनाच चुना…”. त्यानं इन्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. 



लोकप्रिय अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमेनंही एक ट्विट केलं आहे ज्यात तो म्हणतो की, ''खेळ तर आता सुरु झालाय…''



सध्या कलाकारांच्या या ट्विटनं सगळीकडेच धुमाकूळ घातला आहे.