हेमंत चापुडे, झी मिडीया, शिरूर : चो-या करायच्या तुम्ही, लोकांना फसवायचं, लुटायचं, खंडणी गोळा करायची तुम्ही, दंगल घडवायची तुम्ही, आणि ही प्रकरणे अंगाशी यायला लागली की या प्रकरणाच्या मागे आढळरावांचा हात आहे असा कंगावा करायचा. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते व प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल हे दोघेही पूर्वीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी शिरुर येथील पत्रकार परिषदेत केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिरुर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांना ग्रहण लागले असताना माजी खासदार शिवाजी आढळराव पाटीलांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. दिलीप मोहिते व मंगलदास बांदल या दोघांचाही मागील पंचवीस वर्षाचा इतिहास पाहिला तर या दोघांनी अनेकांचे संसार उद्धवस्त केले आणि स्वत: केलेले पाप माझ्या अंगावर टाकतात. माझी पंधरा वर्षातील कारकिर्द पहा आणि या दोघांची कारकिर्द पहा..! 


पैशाच्या जिवावर चाललेली ही दागागिरी आज अनेकांच्या जीवावर येत असून यांच्याकडे हा पैसा कुठून आला असे अनेक प्रश्न आढळराव पाटलांनी उपस्थित केले आहे.