Aditya Thackeray And Rahul Kanal :  एकीकडं 1 जुलैला मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्याची तयारी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) करत आहेत. तर त्याचदिवशी त्यांना शिंदे गटाच्या शिवसेनेकडून जोर का झटका दिला जाणार आहे. आदित्य ठाकरेंचे खास मित्र आणि युवा सेना कार्यकारिणी सदस्य 1 जुलैला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ठाकरे गटाचा मोठा कार्यक्रम असताना ठाकरेंना धक्का देण्याची परंपरा मुख्यमंत्र्यांनी सुरूच ठेवली आहे.आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल (Rahul Kanal ) शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. 


अंतर्गत कुरघोडींना कंटाळून राहुल कनाल बाहेर पडले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहूल कनाल यांनी महिन्यापूर्वी युवासेना कार्यकारिणीचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप सोडला होता. शिवसेनेत येण्यापूर्वी ते काँग्रेसमध्ये कार्यरत होते. राहूल कनाल युवासेनेत नाराज असल्याची चर्चा आहे. राहुल कनाल हे आदित्य ठाकरेंचे अत्यंत जवळचे विश्वासू समजले जातात. राहुल कनाल कोअर कमिटीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून लेफ्ट झाले आहेत. अंतर्गत कुरघोडींना कंटाळून राहुल कनाल बाहेर पडल्याची चर्चा आहे. 
मविआची सत्ता असताना शिर्डी संस्थानवर कनाल यांची विश्वस्त म्हणून वर्णी लागली होती. युवा सेनेतल्या अमेय घोले, सिद्धेश कदम, समाधान सरवणकर यांनीही नाराजी व्यक्त करत युवा सेना सोडली होती. राहुल कनाल हे वांद्रे पश्चिममधून विधानसभेसाठी तयारी करत होते.


शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे शिंदे गटात दाखल


मुंबई महापालिकेत शिवसेनेला पहिलं खिंडार पडलंय. शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे शिंदे गटात दाखल झाल्या आहेत. शिंदे गटात प्रवेश करण्याच्या 20 दिवस आधी अलिबागमध्ये शीतल म्हात्रेंनी शिंदे गटाला इशारा दिला होता. आता, मात्र त्यांनी अचानक भूमिका बदलत थेट शिंदे गटातच प्रवेश केल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मुंबईतले इतरही नगरसेवक लवकरच शिंदे गटात येणार असल्याचा दावा म्हात्रेंनी केलाय. 


उल्हासनगरचे शिवसेनेतील 15 नगरसेवक शिंदे गटात 


ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला लागलेली गळती सुरूच आहे. ठाणे आणि नवी मुंबईपाठोपाठ आता उल्हासनगर महापालिकेतल्या नगरसेवकांनीही उद्धव ठाकरेंना धक्का दिला. उल्हासनगरचे शिवसेनेतील 15 नगरसेवक शिंदे गटात सामील झाले होते. ठाण्यात आनंद आश्रमात या नगरसेवकांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेऊन शिंदे गटात प्रवेश केला. 


बदलापूर पालिकेत शिवसेनेचा सुपडा साफ 


बदलापूर पालिकेत शिवसेनेचा सुपडा साफ झाला. शिवसेनेचे सर्वच्या सर्व 25 नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले. ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा पाटीलही शिंदेंसोबत गेलेत.