Aaditya Thackeray At Thane Mahamorcha : ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदेंना मारहाण प्रकरण चांगलेच तापले आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई न केल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने ठाणे पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढला आहे. या मोर्चावेळी जाहीर सभा घेण्यात आली.  यावेळी आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महिलांचा अपमान करणारे मर्दानगी दाखवतात असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी रोशनी शिंदे प्रकरणात कडक शब्दात टीका केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चोरांचा पक्ष नाही तर चोरांची टोळी असते. महिलेवर हात उचलला जातो. लाथा मारल्या जातात. फेसबुकवर पोस्ट टाकली म्हणून अशा प्रकारे महिलेला मारहाण केली जातेय. मिंधेंच्या लोकांनी महिलेला लाथा मारल्या, फक्त एका पोस्टसाठी.  यावर पोलिस कारवाई करत नाहीत. पोलिस वर्षावर बसून कोणावर कारवाई करायची हे ठरवतात असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.  


ज्या व्यक्तीवर हल्ला होतो त्या महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे यांना मंत्री नेते शिवीगाळ करतात.  राज्यात मोगलाई सुरू. महिलांचा अपमान करणारे मर्दानगी दाखवतात असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नक्कल करुन दाखवली. 


राज्यात अत्यंत घाणेरडं राजकारण सुरु आहे. हे सरकार काही तासांचे आहे. आम्ही बदल्याच्या भूमिकेत काम करत नाही. तरुणांना रोजगार नाही. एकही प्रकल्प सुरु झालेला नाही. हे सरकार घटनाबाह्य सरकार आहे. ठाण्यात येऊन जिंकून दाखवणार असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना खुलं आव्हान दिले आहे. प्रत्येक जिल्ह्यात नारी सन्मान यात्रा काढण्याची घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली.