Aditya Thackeray यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा तडकाफडकी स्थगित; नक्की काय घडलं?
आता आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेचा तिसऱ्या टप्प्याला 9 ऑगस्टपासून सुरूवात होणार होती.
वाल्मिक जोशी, जळगाव : एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे (Eknath Shinde) शिवसेनेत (Shiv Sena) उभी फूट पडली. अनेक मातब्बर नेत्यांनी शिवसेनची साथ सोडली. तेव्हापासून ठाकरे पितापुत्रांनी पक्षाला नवसंजीवणी देण्यासाठी बैठकींचा आणि दौऱ्यांचा सपाटा लावलाय. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) रस्त्यावर उतरून शिवसैनिकांच्या भेटी घेतायेत. तसेच बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रेच्या (Shiv Sanwad Yatra) माध्यमातून जनतेला संबाधित करतायेत. आतापर्यंत आदित्य यांनी शिवसंवाद यात्रेचे 2 टप्पे पूर्ण केले आहेत.
आता आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेचा तिसऱ्या टप्प्याला 9 ऑगस्टपासून सुरूवात होणार होती. यावेळी ते जळगाव ग्रामीन मतदारसंघातील बंडखोर आमदार गुलाबराव पाटील (GulabRao Patil) यांच्या मतदार संघातही जाणार होते. परंतू आदित्य यांची तब्बेत बरी नसल्याने उद्या (9 जुलै) पासून सुरू होणारा उत्तर महाराष्ट्र दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. अशी माहिती जिल्ह्याचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी दिली आहे.