नाशिक : शेतकऱ्यांना आम्ही सरकट कर्जमाफी देणारच असं वक्तव्य शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केले आहे. शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रेतली सभा नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात झाली. यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक शिवसेना नेते उपस्थित होते. सभेआधी आदित्य ठाकरेंची धान्य तुला करण्यात आली. तुलेसाठी वापरण्यात आलेलं ६२ किलो धान्य, गोरगरिबांना वाटण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपला खरा देव हा लोकांच्या हृदयात, मनात असतो. जे शेतकरी बांधव मला आशीर्वाद देतात तो माझा खरा देव आहे. त्याच देवाला आज मी नमस्कार करायला निघालो आहे, हीच माझी खरी जनआशीर्वाद यात्रा आहे असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.


युवासेनेच्या जनआशीर्वाद यात्रेला जळगाव जिल्ह्यातील पाचोरामधून सुरुवात झाली. त्यानंतर खान्देश तसंच धुळ्यामध्ये ही सभा झाली. त्यानंतर आज येवलामध्ये चौथी जनआशीर्वाद यात्रा पार पडली.