प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार : नुकताच आदिवासी दिन साजरा झाला. या निमित्तानं आदिवासी महिलांनी पुन्हा एकदा आपल्या ठेवणीतले दागिने बाहेर काढून घातले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सातपुड्यातल्या आदिवासींच्या सण - उत्सवाचा सोहळा ठसठसशीत दिसून येतो... तो या महिलांनी परिधान केलेल्या दागिन्यांमुळे... नुकताच आदिवासी दिवस साजरा झाला. या दिनानिमित्त आदिवासी महिला विविध दागिने घालून नटतात. या दिवशी आदिवासींचे खास ठेवणीतले दागिने बाहेर काढले जातात. बहुतांश दागिने चांदीचे असतात, हातात वेगवेगळ्या डिझाईनच्या बांगड्या, हातातली कडी आणि बावट्या, गळ्यात चांदीच्या नाण्याची माळ, साखळी आणि चपल्लहार घालतात. 


आदिवासी संस्कृतीत चांदीला महत्त्व आहे. आदिवासींमध्ये लग्नकार्यातही चांदीचेच दागिने खरेदी केले जातात. त्यात चांदीची नथ, नाण्यांची नाठनी हे आदिवासी संस्कृतीत वैभवाचं प्रतीक समजलं जातं. मुलीला लग्नातही माहेरहून चांदीचेच दागिने दिले जातात. 


दिवासी समाजात अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळ्या विधींमध्ये आणि सणांमध्ये चांदीच वापरली जाते. चांदीच्या पुढे सोन्याची किंमतही इथे फिकी ठरते.