Viral News : रोमियो हरवला आहे... शोधून देणाऱ्याला 25 हजाराचे बक्षिस .... अशी जाहिरात सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. हा रोमियो दुसरा तिसरा कुणी नसून एक आफ्रिकन पोपट आहे. ठाण्यातील जोशी परिवाराचा हा लाकडा पोपट आहे. पोपट हरवल्यामुळे जोशी पती पत्नी खूपच काळजीत आहेत. यामुळेच त्यांनी थेट जाहीरातबाजी करत आपल्या लाडक्या रोमियोचा शोध सुरु केला आहे. 


रोमियोला शोधणाऱ्याला  25 हजाराचे बक्षिस  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाण्यातील ऑर्किड हिरानंदानी मेडोज येथील रहिवासी असलेल्या श्रेयस जोशी आणि त्याची पत्नी सीमा जोशी यांनी पोपट हरवल्याची जाहिरात दिली आहे. आपल्या लाडक्या पोपटाचा ते वेड्यासारखा शोध घेत आहेत. तसेत त्यांनी रोमियो हरवल्याची जाहिता देखील वर्तमान पत्रात दिली आहे.


दोन महिन्याचा असतााना रोमियोला आणले होते घरी


दोन महिन्याचा असतााना असताना  रोमियोला घरी आणले होते असे सीमा जोशी यांनी सांगितले. सीमा यांच्यासह त्यांचे पती श्रेयस देखील रोमियाचे खूप लाड करतात. अगदी घरातील सदस्य असल्याप्रमाणे ते रोमियाचे सांभाळ करतात.


एक महिन्यांपासून रोमियो बेपत्ता


एक महिन्यांपासून रोमियो बेपत्ता असल्याची तक्रार सीमा जोशी यांनी केली आहे. 1 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी दीड वाजाण्याच्या सुमरास रोमिया बेपत्ता झाल्याचे सीमा जोशी यांनी तक्रारीत म्हंटले आहे. रोमियो हा 9 वर्षांचा आफ्रिकन ग्रे पोपट आहे. रोमियोला शोधून देणाऱ्या 25 हजार रुपयांचे बक्षिस दिले जाईल असे सीमा जोशी यांनी जाहिरातीत नमूद केले आहे. रोमियो दिसल्यास 9820221098 या क्रमांवर संपर्क साधावा. 


रोमियोच्या पायात विशिष्ट प्रकारची रिंग


रोमियोच्या पायात विशिष्ट प्रकारची रिंग आहे. रोमियोच्या डाव्या पायात ही रिंग आहे. या रिंगवर unique identification number आहे. हा नंबर म्हणजे आधारकार्डसारखा नंबर आहे. 


सर्वात महागडा पोपट


जोशी यांचा रोमिया हा आफ्रिकन प्रजातीचा ग्रे रंगाचा पोपट आहे. आफ्रिकन प्रजातीचे हे पोपट सर्वात महागडा पोपट आहे. याची  किंमत 25 ते 80 हजार रुपयांपर्यंत असते. या अशा प्रकारचे पोपट 23 वर्षांपर्यंत जगतात. तर, काही पोपच हे 90 ते 100 वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतात. यांचे वजन 400 ग्राम इतके असते. यांची उंची 33 सेमी पर्यंत वाढते. या आफ्रिकन पोपटांची शेपटी आणि डोक्याचा भाग सफेद रंगाचा असतो. उर्वरीत सर्व शरीर हे ग्रे रंगाचे असते.