छतावर चढलेल्या वळूला ४८ तासांनंतर खाली उतरविण्यात यश
वळूला गुंगीचे इंजेक्शन दिल्याने सुस्त झालेल्या वळूपर्यंत पोहोचण्याचे धाडस ग्रामस्थांनी केले.
यवतमाळ : यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील महागांव कसबा गावात एका घरावर चढून बसलेल्या वळूला सुखरूप खाली उतरविण्यात ग्रामस्थांना अखेर यश आलयं. ग्रामस्थांनी क्रेन बोलावून त्याद्वारे छतावरील वळूला बांधून त्याला खाली उतरविले. तत्पूर्वी वळूला गुंगीचे इंजेक्शन दिल्याने सुस्त झालेल्या वळूपर्यंत पोहोचण्याचे धाडस ग्रामस्थांनी केले.
धक्कादायक कहाणी
विशेष म्हणजे हा वळू ज्या गणेश राठोड यांच्या घराच्या छतावर शनिवारी रात्री पायऱ्या चढून पोहोचला होता. त्यांचे वडील परशराम यांचे याच दरम्यान निधन झाले होते. रात्री परशराम यांनीच घरावरील वळू ला चारापाणी केले, वळू काही केल्या खाली उतरेना म्हणून ग्रामस्थ एकीकडे चिंतीत होतेच शिवाय तो खाली उतरेल कसा याबाबत कुतूहलही होते.