भारतीय चलनावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो? नितेश राणे म्हणाले, हे...
देशाच्या प्रगतीसाठी लक्ष्मीचा आणि गणपीचा फोटो नोटांवर लावण्याचे आवाहन केजरीवाल यांनी केले होते
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) यांनी भारतीय चलनावर देवी लक्ष्मी (lakshmi) आणि गणपतीचा (Ganpati) फोटो लावण्याची मागणी केल्यानंतर राजकारण अधिकच तापले आहे. देशाच्या प्रगतीसाठी देवी लक्ष्मीचा (lakshmi) आणि गणपीचा (Ganpati) फोटो भारतीय चलनावर (indian currency) लावण्याचे आवाहन केंद्र सरकारला केले आहे. नव्या नोटांवर देवी लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केजरीवाल (arvind kejriwal) यांनी पत्रकार परिषद घेत केली आहे. नोटांवर महात्मा गांधींचा फोटो तसाच ठेवत दुसऱ्या बाजूला लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापला पाहिजे असं अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) यांनी म्हटलं आहे. यानंतर आता देशाच्या विविध भागातून वेगवेगळ्या मागण्या सुरू झाल्या आहेत. भाजप नेत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेल्या नोटेचा फोटो शेअर केला आहे. (BJP MLA Nitish Rane Tweets Rs 200 Note With chhatrapati shivaji maharaj Pic)
भाजप (BJP) नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांचा फोटो असलेल्या नोट ट्विटरवर पोस्ट केली आहे. यासोबतच त्यांनी 200 रुपयांचा फोटोशॉप केलेल्या नोटेचा फोटोही पोस्ट केला आहे. कणकवलीचे आमदार नितीश राणे (Nitesh Rane) यांनी हा फोटो ट्विट करत, "हे परफेक्ट आहे," असं म्हटलं आहे.
गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी हे विधान केल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो भारतीय चलनावर असावा, असा सल्ला त्यांनी दिला आहे. अर्थव्यवस्थेला बळकट करण्याचा हा एक मार्ग असू शकतो, असे मत त्यांनी मांडले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन थांबवण्यासही यामुळे मदत होऊ शकेल, असा दावाही त्यांनी केला.
या मागणीवरून भाजपमध्येही नाराजी आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आप केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. केजरीवाल आपल्या सरकारच्या त्रुटी आणि आम आदमी पक्षाच्या हिंदुविरोधी मानसिकतेपासून लोकांचे लक्ष वळवण्यासाठी नाटक करत आहेत, असे भाजपने म्हटले आहे.
भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत जे काही बोलले त्यातून त्यांचा ढोंगीपणा दिसून येतो. अरविंद केजरीवाल महात्मा गांधींना बाजूला करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते शाहनवाज हुसैन यांनी केला. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विटरवर त्यांना हिंदुविरोधी कट्टरवादी म्हटले आहे.