अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट; बड्या नेत्यांची यादीच दिली
Ashok Chavan : काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर आमदार रवी राणा यांनी मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या काँग्रेस नेत्यांची यादीच रवी राणा यांनी दिली आहे.
Ashok Chavan Resign :माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारमात एकच खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर आमदार रवी राणा यांनी मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे. रवी राणा यांनी काँग्रेसच्या बड्या नेत्यांची नावे फोडली आहेत.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस आणि राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर आमदार रवी राणा यांनी आपली प्रतिक्रिया देत खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. येत्या काळात काँग्रेस पक्षात मोठा भूकंप होईल. आमदार रवी राणा यांनी काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांची नावे घेत गौप्यस्फोट केला आहे.
अशोक चव्हाण यांच्यानंतर विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार हे सुद्धा राजीनामा देतील. दरम्यान, काँग्रेस नेत्या आणि आमदार यशोमती ठाकूर या सुद्धा भाजपच्या संपर्कात आहेत असा दावा रवी राणा यांनी केला आहे. यशोमती ठाकूर यांचे नाव न घेता आमदार रवी राणा यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. येत्या काळात तिवसा मतदार संघातही मोठा चमत्कार दिसेल असेही राणा म्हणाले आहेत.
अशोक चव्हाण यांचा निर्णय धक्कादायक; विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया
राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण यांचा निर्णय धक्कादायक असून मी गेली 16 वर्षे त्यांच्यासोबत काम केले, त्यांच्या मंत्रिमंडळात देखील मी सोबत काम केले आहे असे वडेट्टीवार म्हणाले.
माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमावर यांची प्रतिक्रिया
अशोक चव्हाण यांना काँग्रेसने अनेक पद दिली. जवळपास मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष अशी पदे त्यांनी भूषवली. तरी त्यांनी पक्ष का सोडला हे अनाकलनीय आहे.
राज्या राज्यातील पक्ष कमजोर करून ते देशात अशा पद्धतीने 400 पार करणार. सेनापतीने लढले पाहिजेत. मात्र, ते पदाच्या लालसेने पक्ष सोडून नेले. त्यांना आउट ऑफ वे जाऊन मुख्यमंत्री पद दिले होते असे देखील विलास मुत्तेमावर म्हणाले.