अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच शासकीय खाजगी शाळा महाविद्यालय अद्यापही बंद आहे. परंतु दिवाळी नंतर राज्यातील वर्ग ९ ते १२ वी पर्यत शाळा सुरू करणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंत्री बच्चू यांनी दिली. कोरोना काळातील सर्व नियम अटी ठेवूनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे असही शिक्षण राज्यमंत्री बच्चू म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊन मध्ये आता राज्यात अनलॉक सुरू आहे. जवळपास सर्व बाबी या खुल्या करण्यात आल्या असल्या तरी मंदिरे आणि विद्यामंदिरे अजूनही बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी दिवाळी नंतर राज्यातील ९ ते १२ पर्यत शाळा सुरू करणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली.



या शाळा सुरु करत असताना सरकारच्या वतीने एक चांगल धोरण आखण्यात येईल. या धोरणाच्या माध्यमातून कोणीही कोरोनाने बाधित होणार नाही आणि शिक्षणही व्यवस्थित दिल्या जाईल अशा प्रकारची भूमिका ही सरकार ची आहे. जर एखाद्या शिक्षकाचे वय ५० च्या पुढे असेल तर शिक्षकच्या ऐवजी दूसऱ्या शिक्षकाला तिथे घेता येईल का. तसेच बाधित मुलं शाळेत येऊ नये या साठी विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करता येईल का असाही विचार सुरू असल्याच शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले.