अहमदनगर : पतीने पत्नीला जाळल्याची घटना समोर आली आहे. पतीने पत्नीवर पेट्रोल टाकून तिला जाळल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने संपूर्ण अहमदनगर परिसर हादरलं आहे. हा घटनेची एवढी माहिती आतापर्यंत समोर आली आहे. नेवासेच्या मोरेचिंचोरे गावातील घटना अतिशय धक्कादायक.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंगणघाट जळीतकांडातील तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर साऱ्या राज्यातून आणि सर्वच स्तरांतून संतापाची लाट उसळली. जोवर या घटनेच्या चर्चा थांबत नाहीत, तोवर राज्यात पुन्हा एकदा अशाच प्रकारची धडकी भरणारी घटना घडली आहे. घरगुती वादातून २६ वर्षांच्या विवाहितेला जिवंत पेटवून दिल्याची घटना हिंगोली जिल्ह्यात घडली आहे. 




हिंगोलीतील आडगाव येथे घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा जळीतकांडाचं सत्र सुरुच असल्याचं उघड झालं आहे. संगीता शंकर हनवते असं या महिलेचं नाव असून, ती सुमारे ७४ टक्के भाजली आहे. तिच्यावर अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.