Nashik Sunita Dhangar Bribe Case:  नाशिक महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनिता धनगर यांना लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली (Nashik Crime News). यानंतर शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली. लाखोरीतून सुनिता धनगर यांनी कोट्यावधीची संपत्ती जमवली आहे. सुनिता धनगर यांच्या चौकशीत  लाचखोरीचे रेड कार्डच  तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागले आहे.  यानंतर आता राज्यातील अनेक लाचखोर शिक्षक, शिक्षण अधिकारी लाच लुचपत विभागाच्या रडावरआले आहेत. अनेक ठिकाणी लाच लुचपत विभागाने धाडी टाकल्या आहेत. लाचखोर शिक्षण अधिकाऱ्यांची उघड चौकशी करा असे पत्रच  शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी अ‍ॅन्टी करप्शनला दिले आहे. 


पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर मध्ये धाडसत्र


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यातील लाचखोर शिक्षक, शिक्षण अधिकार्‍यांच्या चौकशी होण्याची शक्यता आहे.  शिक्षक, शिक्षण अधिकार्‍यांवर लाच लुचपत विभागाने कारवाई अथवा छापे टाकले आहेत अशा सर्वांची उघड चौकशी करा अशी मागणी करणारे पत्र शिक्षण आयुक्तांनी अ‍ॅन्टी करप्शनला दिले आहे.


लाचखोर शिक्षक, शिक्षण अधिकारी पुन्हा सेवेत रूजू होतात 


शिक्षक, शिक्षण अधिकारी लाच घेताना रंगेहाथ जाळयात सापडतात. चौकशी आणि कारवाई नंतर ते पुन्हा सेवेत रूजू होतात आणि पुन्हा भ्रष्टाचार करतात. मात्र, त्यांच्यावर अ‍ॅक्शन घेतली जात नाही. यासाठीच शिक्षण आयुक्त यांनी लाच लुचपत विभागाला त्या अधिकाऱ्यांची उघड चौकशी व्हावी म्हणून पत्र दिल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.  जे अधिकारी या प्रकरणात आहेत त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक यांनी दिली आहे. 


भ्रष्ट शिक्षणअधिकारी  अ‍ॅन्टी करप्शनच्या रडारवर 


नाशिक महापालिकेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनिता धनगर यांना रंगेहात अटक करण्यात आली. अँटीकरप्शन ब्युरोने धनगर यांच्या घरातून 85 लाखांची रोकड आणि 32 तोळं सोनं जप्त करण्यात आले. तर, काही मालमत्तांची कागदपत्रेही सापडली होती. सुनिता धनगर यांच्या नावावर दोन फ्लॅट आणि एक प्लॉट असल्याची माहिती मिळतेय. फ्लॅटची किंमत कोट्यवधींच्या घरात असल्याचं अँटीकरप्शन ब्युरोने सांगितले. चौकशीदरम्यान सुनिता धनगर यांचे लाचखोरीचे रेड कार्ड हाती लागले आहे. सुनीता धनगर यांच्याकडे अजून तीस लाख रुपयांची माया आढळून आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेसह विविध चार खात्यांमध्ये रकमेचा तपशील बँकांनी लाचालूच पत विभागाकडे पाठवला आहे. त्यामुळे आता धनगरांची धनमाया एक कोटी 34 लाखापर्यंत पोहोचली आहे.  यानंतर आता राज्यभरातील भ्रष्ट शिक्षणअधिकारी रडारवर आले आहेत.