Navi Mumbai Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray : नवी मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर शिंदे गटाने (Eknath Shinde Group) शिवसेनेवरच दावा ठोकला. त्यानंतर हा लढा आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. तर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि शिवसेनेची निशाणी गोठवून टाकली. त्यामुळे ठाकरे गटाला (Thackeray Group ) मोठा धक्का बसला. आता मूळ शिवसेनेच्या शाखा या राज्यात अनेक ठिकाणी आहेत. या शिवसेनेच्या शाखांवर शिंदे गटाकडून दावा सांगण्यात येत आहे. ठाण्यानंतर नवी मुंबईतही 'शिवसेना शाखा' घेण्यावरुन शिंदे-ठाकरे गट आमने-सामने आले आहेत. नवी मुंबईतील शाखेवर शिंदे गटाने दावा केल्याने नवा वाद उभा राहिला आहे. (Shinde group-Thackeray group dispute over taking over Shiv Sena branch in Navi Mumbai  )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाण्यानंतर नवी मुंबईतही शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरुन वाद उफाळल्याचे दिसून येत आहे. शिंदे गटाकडून नवी मुंबईतील तुर्भे विभागातील तीन शाखा ताबा घेण्याचा प्रयत्न झाला आहे. माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी कार्यकर्त्यांसह येत हातोडी आणि कटरने शाखेचा लॉक तोडण्याचा प्रयत्न केला. याला ठाकरे गटाकडून तीव्र विरोध केल्यानंतर तीन्ही शाखांवर आता दोन्ही गटाची दोन टाळी लागली आहेत.


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, उपशहर प्रमुख महेश कोटीवाले यांनी शाखा ताब्यात घेण्यासाठी आलेल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना परतवून लावले आहे. मात्र, शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी शाखेला ठाळे ठोकले आहे. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. हा वाद विकोपाला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


दरम्यान, याआधी ठाण्यात राडा पाहायला मिळाला होता. कोपरीतील शिवसेना शाखेवरुन हा वाद उफाळला. शिंदे गट आणि शिवसैनिक आमने- सामने आलेत. यावेळी पोलिसांनी काढला मार्ग काढत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मनोरमानगर भागात वाचनालय ताब्यात घेण्यावरुन काही दिवसांपूर्वी शिंदे आणि ठाकरे गटात वाद झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघातील कोपरीतील कुंभारवाडा भागातील शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरुन शिंदे आणि ठाकरे गटात वाद झाला होता.