पुणे : विदर्भात पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा, पुणे वेधशाळेने दिला आहे. आजपासून पुढील पाच दिवस विदर्भात तापमानाचा पारा आणखीनच वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही हवामान खात्याने केले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे विदर्भातील काही भागातील तापमान ४६ डिग्रीपर्यंत जाऊन पोहोचण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान आठवड्याच्या सुरुवातीला पुणे, नाशिकसह मध्यमहाराष्ट्रातील उष्णतेची लाट सध्या ओसरली. मात्र तरीही येथील तापमान पुढील ७२ तासांत डिग्री सेल्सियसच्या आसपास राहणार असल्याचे हवामान शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेधशाळा निर्माण होण्यापूर्वीआपल्याकडील पंचांगात पावसाविषयी अंदाज व्यक्त केला जात असतो. पंचांगात  यावर्षींच्या पावसाविषयी काय अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. पर्जन्य नक्षत्रांच्या तारखा व नक्षत्रांची वाहने कोणती आहेत याविषयीची माहिती पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. यावर्षी सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस पडेल असा अंदाज पंचांगांमधून व्यक्त करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.


 हत्ती वाहन , १ घोडा, २ कोल्हा, ३ बेडूक, ४ मेंढा , ५ मोर, ६ उंदीर, ७ म्हैस, ८ गाढव अशी वाहने असतात. बेडूक,म्हैस आणि हत्ती वाहन असता खूप पाऊस पडतो. मोर, गाढव, उंदिर वाहन असतांना अनियमित आणि कमी पाऊस पडतो. कोल्हा आणि मेंढा वाहन असता अल्प पाऊस पडतो. घोडा वाहन असतांना पर्वतावर पाऊस पडतो, असे सांगण्यात आले आहे.


पंचांगातील पावसाचे अंदाज हे केवळ ठोकताळे असतात. अनेक वर्षांपूर्वींपासून असे सांगण्यात येतात. ते कधी चुकतात तर कधी बरोबर येतात. अर्थात ते वेधशाळांच्या अंदाजांप्रमाणे वैज्ञानिक निकषावर आधारलेले नसतात,  असेही दा. कृ. सोमण यांनी स्पष्ट केले.