नांदेड : काही महिन्यांपूर्वी पालघर येथे दोन साधूंची हत्या करण्यात आली होती. ही धक्कादायक घटना ताजी असतानाच नांदेडमध्ये ब्रह्मचारी शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण नांदेडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. उमरी तालुक्यातील नागठाणा याठिकाणी रात्री दीडच्या सुमारास ही हत्या करण्यात आली. या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ही हत्या गावातील एका अज्ञात  तरुणाने केली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगण्यात येत आहे की, एका  तरुणाने महाराजांच्या मठात प्रवेश करून त्यांच्याजवळील ऐवज लुटला आणि त्यानंतर गळा दाबून त्यांचा खून केला. त्यानंतर तो महाराजांचीच गाडी घेवून पळण्याच्या प्रयत्नात होता. पण अवती-भोवतीच्या लोकांना जाग आल्यामुळे त्याने पलायन केले. घटनेची माहिती मिळताच महाराजांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. 


एकढंचं नाही तर, ज्या मठामध्ये शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांचा खून करण्यात आला त्याच मठातील बाथरूममध्ये अन्य एक मृतदेह सापडला असून मयताचे नाव भगवान शिंदे असं आहे. ते मठाचे सेवेकरी असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.