जालन्यात वाढत्या महागाईविरोधात धडक मोर्चा
गेल्या तीन वर्षात पेट्रोल, डिझेल, गॅसचे वाढलेले भाव, सतत वाढणारी महागाई आणि कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या पदरात पडण्यास होणारा उशीर याविरोधात आज जालना जिल्हा शिवसेनेच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला.
जालना : गेल्या तीन वर्षात पेट्रोल, डिझेल, गॅसचे वाढलेले भाव, सतत वाढणारी महागाई आणि कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या पदरात पडण्यास होणारा उशीर याविरोधात आज जालना जिल्हा शिवसेनेच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला.
मामा चौक ते महाविर चौक दरम्यान काढण्यात आलेल्या या मोर्चात शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.यावेळी सरकार विरोधी घोषणांचे पोष्टर हातात घेऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या कारभाराचा जाहीर निषेध नोंदवला.
या मोर्चात सायकलवर आणि बैलगाडीतून प्रवास करून मोर्चेकऱ्यांनी महागाईला विरोध दर्शवत सरकार विरोधात घोषणाबाजी केली. सत्तेत राहूनही शिवसेनेला जर मोर्चे काढावे लागत असतील तर उद्धव साहेब सरकारचा पाठिंबा काढून घ्या अशी मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली.