Abdul Sattar Controversial Statement :  कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा बरळले आहेत. नुकसानग्रस्त शेतीच्या पाहणीला अब्दुल सत्तार चक्क अवकाळी पर्यटन म्हणाले आहेत. सत्तार यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात अवकाळी पावासाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कोसळले आहे. तातडीने सरकारी मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अवकाळी पासामुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा केल. मात्र, यावेळी संजय राऊत यांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना अब्दुल सत्तार यांनी वादग्रस्त वक्तव्य केले.  गारपीठ आणि अवकाळी पर्यटनच आहे असं विधान अब्दुल सत्तार यांनी केले आहे. 


वादग्रस्त वक्तव्यानंतर पुन्हा माघार


बीड जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि गारपीटग्रस्त भागाची मी स्वतः पाहणी केली खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान झालं आहे. काही ठिकाणचं 99% नुकसान झाल्याचे प्रथमदर्श दिसत आहे. त्यामुळे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले. 


आसमानी संकटाचा मुकाबला करणाऱ्या शेतकऱ्यांना हात जोडून विनंती आहे सरकार तुमच्या पाठीशी आहे लवकरच तुम्हाला मदत केली जाईल असा आश्वासन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना दिले आहे. यावेळी बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ कृषी अधिकारी बाळासाहेब जेजुरकर यांच्यासह प्रशासनातील सर्व अधिकारी तहसीलदार यांची उपस्थिती होती. अतिवृष्टी गारपिट आणि अवकाळी मुळे हवालदील झालेल्या शेतकऱ्याच्या पाठीमागे सरकार खंबीर आहे.  नुकसानीचे तंतोतंत 
पंचनामे करून महाराष्ट्रातील, कोकण, विदर्भ तसेच ज्या ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे त्या सर्व भागातील शेतकऱ्यांना मदत केली जाणार असल्याचे सत्तार म्हणाले. 


आदित्य ठाकरे पुन्हा अवकाळी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार


मुख्यमंत्र्यांनी देव देव करण्यापेक्षा अवकाळी पाऊसाने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत थोरात यांनी व्यक्त केले आहे. आदित्य ठाकरे पुन्हा अवकाळी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा अयोध्या दौरा सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाकडून दौऱ्याची तयारी सुरू आहे. राज्यात अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. विदर्भ, मराठवाडा, नाशिक आणि अमरावती भागात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेण्याचं काम सुरू आहे...माहिती घेऊन दौऱ्याची रूपरेषा ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याला ठाकरे गट अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या भागात दौरा करून उत्तर देण्याच्या तयारीत आहे. या दौऱ्यात स्वतः उद्धव ठाकरे जाणार की आदित्य ठाकरे जाणार आहेत, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.