अहमदनगर : संपूर्ण राज्य मिळून आज कोरोनाशी दोन करतंय. प्रत्येक जण यामध्ये आपलं महत्वाचं योगदान देतयं. अशामध्ये नगरमध्ये दगडी दवाखान्याचा उल्लेख ठळकपण करावा लागेल. अनेक खासगी रुग्णालयांनी जेव्हा कोरोना रुग्णांना ठेवण्यास नकार दिला तेव्हा या दगडी दवाखान्याने म्हणजेच बूथ हॉस्पीटलने पुढाकार घेत कोरोना रुग्णांना ठेवण्यास परवानगी दिली. आतापर्यंत तिथे ३१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार झाले असून सर्वजण सुरक्षित आहेत. खरंतर या दगडी रुग्णालयाला शंभर वर्षांहून जुना रुग्णसेवेचा इतिहास आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नगरमध्ये बूथ हॉस्पिटलची सुरुवातची सुरुवात तसं पाहता १९०२ मध्ये झाली. पण त्याआधी अमेरिकन मिशनरी डॉक्टर्सनी हे कार्यक्षेत्र म्हणून निवडले होते. चांदणी चौकाकडून स्टेट बॅंकच्या दिशेने वळताना कोपऱ्याला अमेरिकन मराठी मिशनरींनी प्लेगच्या साथीतील रुग्णांना तंबूमध्ये ठेवले. जे कोणी वाचले त्यांना घरी पाठवले जायचे. जे मृत होतं असतील त्यांच्या नातेवाईकांना चादरी आणायला सांगितले जायचे त्यात गुंडाळून हे मृतदेह दिले जायचे. मग ते पुरले जायचे किंवा जाळले जायचे. १९०२ पर्यंत हे सुरु होतं. 


यानंतर नवं पर्व सुरु झालं. अमेरिकन मराठी मिशनऱ्यांनी बुथ रुग्णालयात रुग्णांची सेवा केली. युद्धातील जखमींना तसेच टीबीच्या रुग्णांना ठेवलं जायचे. त्यावेळी डॉक्टर्स टीबी रुग्णांना स्वत:च्या रुग्णालयात ठेवत नसतं. तेव्हा या बुथ रुग्णालयात टीबी रुग्णांची मनोभावे सेवा केली जायची. 



बुथ रुग्णालय हे झपाट्याने वाढत गेलं. टीबीच्या रुग्णासोबत एड्सचे रुग्ण देखील येथे ठेवले जायचे. यामुळे कदाचित येथे इतर रुग्ण येण्याचे प्रमाण कमी झाले. 


आज कोरोना पॉझिटीव्ह असलेले रुग्ण इथे ठेवण्यात आले आहेत. मोठमोठे दवाखाने जिथे रुग्णांना घ्यायला तयार नाहीत तिथे या दगडी दवाखान्यात रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामुळे या रुग्णालयाने आपली रुग्णसेवेची परंपरा शंभर वर्षानंतरही कायम ठेवल्याचे दिसून येत आहे.