नागपूर : शिवसेनेचा विरोध डावलून राज्य सरकारनं अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनसाठी आर्थिक तरतूद करण्यात आलीय. पुरवणी मागण्यांमध्ये बुलेट ट्रेनसाठी २५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आज विधिमंडळात सरकारनं ११ हजार ४४५ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. विशेष म्हणजे बुलेट ट्रेनच्या तरतूदीचे अर्थराज्यमंत्री आणि शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी समर्थन केले आहे. त्यामुळे आता शिवसेना यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे लक्ष लागलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, विरोधकांनी अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनला जोरदार विरोध केलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुलेट ट्रेनची एकही विट रचू देणार नाही, असा थेट इशारा पालघर येथील जाहीर सभेत दिलाय. तर विरोधांनी ही बुलेट ट्रेन हवेय कशाला, असे सांगत जोरदार विरोध केलाय.



दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बुलेट ट्रेन हे ड्रीम आहे. त्यामुळे भाजपने या प्रकल्पाचे जोरदार समर्थन केलेय. त्यामुळे या  प्रकल्पाला विरोध होत असला तरी भाजपकडून हा प्रकल्प रेटण्यात येत आहे. शिवसेनेचा विरोधही डावलूनही बुलेट ट्रेनसाठी आर्थिक तरतूद करण्यात आलीय.