AI in Pench Tiger Reserves: मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्याकरता पेंचच्या जंगल परिसरात गावाच्या वेशीवर व्हर्चुअल वॉल (आभासी भिंत) ही नवी यंत्रणा लावण्यात आली आहे.  ही यंत्रणा कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित कॅमेऱ्यांचा व सेन्सरचा वापर करून चालविण्यात येत आहे.  महत्त्वाचं म्हणजे AI आधारित वन्यजीव निरीक्षण प्रणालीसाठीची ही Virtual wall' पोर्टेबल आहे.  मानव- वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या आणि बफर क्षेत्रातील लोकांची वन्यजीवांपासून सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्य उद्देशाने बफर क्षेत्रात ही आभासी भिंत (Virtual wall) उपयुक्त ठरणार आहे. या व्हर्च्युअल वॉल सिस्टीममुळे वास्तविक-वेळ निरीक्षण प्रणाली तयार करून मानव-वाघ वन्यजीव संघर्ष कमी होण्यास मदत होणार आहे. ही यंत्रणा वाघ आणि इतर हिंस्र प्राण्याच्या हालचाली रियल टाईम शोधू शकते आणि वन अधिकाऱ्यांना लवकर सूचना देऊ शकते. ज्यामुळे मानव आणि पाळीव प्राणी यांच्यावरील हल्ल्याचा धोका होऊ शकतो. पोर्टेबल वर्चुअल वॉलचा हा देशातील पहिलाचं प्रयत्न आहे.


पेंचमधील पोर्टेबल Virtulal वॉल नेमकी कशी ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हर्च्युअल वॉल ही इंटरनेट युक्त क्षमतांसह स्मार्ट एआय कॅमेऱ्याची एक साखळी आहे. जी जंगल आणि गावाच्या सीमेवर एकमेकांशी जोडलेली आहे. कॅमेरे IoT प्लॅटफॉर्मद्वारे क्लाउड सर्व्हरवर प्रतिमा प्रसारित करण्यास सक्षम आहेत, जेथे AI यंत्रणा वापरून प्रक्रिया केली जाते. मिळवलेल्या प्रतिमेची डेटाबेसशी तुलना करून नेमका वाघ (वा अन्य प्राणी) ओळखण्यासाठी मशीन लर्निंग अल्गोरिदम (Machine learning algorithm) वापरले जातात.


मानव-वाघ संघर्षाच्याबाबतीत, प्रतिमा वाघांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात. हे कॅमेरे तसेच प्राणी शोध प्रणाली वन्यप्राण्यांची कोणतीही हालचाल शोधतात जसे की हिंस्र प्राणी वनक्षेत्रातून गावाच्या वेशीपर्यंत आले तर वन अधिकारी आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना व संपूर्ण यंत्रणेला त्याचवेळी अपडेट पाठवतात. हा AI प्लॅटफॉर्म प्राण्यांबरोबर व्याघ्र प्रकल्पामधील मानवी हस्तक्षेप, अवैध बेकायदेशीर घुसखोरी किंवा शिकारीच्या उद्देशाने वनामध्ये होणारी घुसखोरी रोखण्यास सुद्धा सक्षम आहे. प्लॅटफॉर्म विशिष्ट क्षेत्रातील तृणभक्षी प्राण्यांची घनता ओळखण्यास सक्षम आहे. प्लॅटफॉर्म डेटाबेसमधून विशिष्ट वाघ शोधण्यास आणि तो शेवटचा कुठे दिसला होता आणि त्याच्या आसपास असणाऱ्या इतर वाघांचा मागोवा घेण्यास सक्षम आहे. 


वाघ दिसल्यास वन अधिकाऱ्यांसाठी ईमेल आणि संदेशांच्या स्वरूपात अलर्ट तयार केले जातात. इंटरनेटचा वेग चांगल्या प्रकारे वापरण्यासाठी सिस्टमची रचना केली गेली आहे ज्यामुळे कमी नेटवर्क भागात देखील डेटा हस्तांतरित करता येईल. याशिवाय, कमी प्रकाश असतानादेखील देखील ते प्रतिमा कॅप्चर करू शकतात. कारण रात्रीच्याच वेळी प्राण्याची हालचाल जास्त होत असते. 


पोर्टेबल आभासी भिंत कशी उभारली


पेंच व्याघ्र प्रकल्पाने हे कॅमेरे विशेष पद्धतीने बनवून घेतले आहेत. शिवाय लेझर सेन्सर ही बसवण्यात आले आहे. ही संपूर्ण यंत्रणा एका पोर्टेबल फिरत्या गाडीवर आहे. त्यामुळे एकाच जागी स्थिर राहणार नाहीत आणि ज्या भागात मानव-प्राणी संघर्षाच्या घटना अधिक आहे. तेथे त्यांचा वापर करता येईल. त्यामुळे कॅमेऱ्यांची साखळी कायमस्वरूपी ठेवण्याची गरज भासणार नसल्याने खर्च कमी होईल.